शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

दोन कोटी वृक्षांची लागवड लिम्का बुकात

By admin | Updated: September 19, 2016 04:55 IST

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात राबविण्यात आलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे.

चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात राबविण्यात आलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याने वन खात्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.१ जुलै २०१६ रोजी वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाने राज्यात १२ तासांत लोकसहभाग, विविध सामाजिक संस्था संघटना आणि शासकीय यंत्रणांच्या मदतीने २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ वृक्ष लागवड केली गेली. १५३ प्रकारच्या प्रजातींच्या रोपांची लागवड ६५ हजार ६७४ जागांवर ६ लाख १४ हजार ४८२ लोकांच्या माध्यमातून केल्याच्या विक्रमाचीसुद्धा नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. सन २०१६-१७चा अर्थसकल्प विधानसभेत सादर करताना वित्त व वनमंत्री मुनगंटीवार यांनी राज्यात वनाच्छादन वाढावे आणि पर्यावरणाचा समतोल साधला जावा, यादृष्टीने राज्यात २ कोटी वृक्ष लागवड वनमहोत्सव साजरा करण्याचा संकल्प जाहीर केला होता. वृक्षसंपदा झपाट्याने नष्ट होत असल्याने हा संकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक होते, याची जाणीव मुनगंटीवारांना होती. त्यामुळे या संकल्पपूर्तीसाठी त्यांनी स्वत: जातीने लक्ष देऊन जनजागृती केली. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना, धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह बैठकी घेतल्या. राज्यात महसूल विभागस्तरावर बैठकी घेऊन या वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे नियोजन केले. आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना भेटून संबंधित विभागांच्या जागांवर वृक्षारोपणाची विनंती केली. तसेच भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपणास सकारात्मक प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)>वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मेहनततरूणाईच्या सहभागासाठी ‘सेल्फी विथ ट्री’सारखी अभिनव स्पर्धा घेतली. दोन महिने वनमंत्री मुनगंटीवार यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. राज्यात २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ रोपांची विक्रमी लागवड करण्यात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यशस्वी ठरला.