शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लिम्का बुकनं दुष्काळाविरोधातल्या लढ्यातील २,४७५ जणांची घेतली दखल

By admin | Updated: May 7, 2017 20:13 IST

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे

आॅनलाइन लोकमतदहिवडी (सातारा), दि. 7 - दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे. त्यातूनच रविवारी २,४७५ लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून एका दिवसात २१० लुज बोल्डर बांधले. या श्रमदानाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली असून, त्यांनी या श्रमदानाची माहितीही मागविली आहे.बिदाल गावाने वॉटर कप जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. ग्रामस्थांनी एका दिवसात २१० लुज बोल्डर श्रमदानातून बांधून नवा अध्याय रचला आहे. प्रत्येक लुज बोल्डरसाठी दहा लोक आणि एक दगड जुळणारा एक अनुभवी कारागीर असे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेला ग्रामस्थांबरोबरच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील आयडीएलच्या संस्थापिका वैशाली शिंदे यांचा ४५ जणांचा ग्रुप, माण मेडिकल डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ, वडगाव, खांडेवस्ती येथील ग्रामस्थांनीही उपस्थिती लावली होती. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने श्रमदान करून २१० लुज बोल्डर बांधले. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.वॉटर कप स्पर्धेअंतर्गत माण तालुक्यातील ३२ गावांमध्ये कामे सुरू असून, या गावांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. बिदाल ग्रामस्थांनी एकी दाखवत पावसाचे पडणारे पाणी मुरवण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. ग्रामस्थ दररोज सकाळी सहा वाजल्यापासून श्रमदानासाठी कामाच्या ठिकाणी पायी तसेच वाहनांनी येतात. त्यांच्या पिण्याचे पाणी व सरबताचीही सोय ग्रामस्थांतर्फे केली जाते.गावाला जैन फाऊंडेशनने एक, शासनाचे दोन, शेखर गोरेंचे एक जेसीबी मशिन मोफत तर अंकुश गोरे यांनी डिझेलवर एक मशीन पोकलेन दिली. तसेच ग्रामस्थांनी दोन पोकलेन, सहा जेसीबी भाड्याने घेतल्या आहेत. त्यातूनच रविवारच्या श्रमदानातून एका दिवसात २१० लुज बोल्डर बांधण्यात यश आले आहे.  बिदाल ग्रामस्थांच्या एकीमुळे दोन तासांमध्ये केलेलं श्रमदान हे एक कोटी रकमेपेक्षा जास्त मोलाचं आहे. रविवारच्या श्रमदानामुळे अडीच कोटी लिटरमध्ये जास्त पाणीसाठा होऊ शकतो. ही एकजूटच बिदाल ग्रामस्थांना वॉटर कप स्पर्धा जिंकून देईल.- भगवानराव जगदाळे,जिल्हा नियोजन अधिकारी, सातारा.