शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

बॉम्बशोधक पथकातील लिलोचे निधन

By admin | Updated: April 24, 2017 02:33 IST

रायगड पोलीस दलातील लिलो कुत्र्याचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. लिलोवर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात

अलिबाग : रायगड पोलीस दलातील लिलो कुत्र्याचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. लिलोवर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लिलो गेली सात वर्षे बॉम्बशोधक पथकामध्ये कायर्रत होता.रायगड पोलीस दलात लिलो हा अंदाजे दोन महिन्यांचा असतानाच दाखल झाला होता. २००८ साली लिलोला पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणासाठी पाठविले होते. लिलोचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला २०१० साली पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकात दाखल केले होते. लिलोने त्याच्या कार्यकाळात एकूण ७४६ कॉल यशस्वी केले होते. त्यातील बॉम्ब थ्रेडसंबंधी ६ आणि ५ बॉम्बसंदर्भातील अशा एकूण ११ कॉल्सचा समावेश आहे. त्यातील काही कॉल फेक निघाले होते. लिलोला आतापर्यंत २५ बक्षिसे सरकारच्या वतीने देण्यात आली होती.लिलो गेली १५ दिवस आजारी होता. अलिबाग शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होेते. उपचारास त्याचे शरीर प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे रविवारी नेण्यात येणार होते. मात्र सकाळी ९ च्या दरम्यान लिलोची प्राणज्योत मावळली. पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या डॉगचा काम करण्याचा कार्यकाळ साधारणत: १० वर्षांचा असतो. त्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती देण्यात येते. लिलोला पोलीस दलात ९ वर्षे पूर्ण झाली होती. पुढच्या मे महिन्यामध्ये लिलोला पोलीस दलातून निवृत्ती मिळणार होती.रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दुखवटा व्यक्त करून लिलोला श्रद्धांजली वाहिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, सुरक्षा विभागाच्या श्रीमती बुरांडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)