शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग प्रमाणपत्र वितरण धिम्या गतीने

By admin | Updated: May 15, 2017 00:57 IST

अमरावती अविभाग : गत डीच महिन्यांत फक्त ३२०० प्रमाणपत्रे जारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून त्यांना विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या सोयी-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे काम मात्र अत्यंत धिम्या गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. १ मार्च २०१७ ते १३ मे २०१७ या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी अर्ज केलेल्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील ५५६९ व्यक्तींपैकी केवळ ३२०० दिव्यांगांनाच हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना शासनाकडून दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी केल्या जाते. यासाठी संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रीतसर अर्ज करावा लागतो. शारीरिक दिव्यांगत्व, दृष्टिदोष, कर्णबधिर, मानसिकदृष्ट्या असामान्य असलेल्यांना विविध तपासण्यानंतर हे प्रमाणपत्र जारी केले जाते. यासाठी दिव्यांगत्वाची टक्केवारी किमान ४० असावी लागते. यासाठी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दररोज अनेकजण जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अर्ज दाखल करतात. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाकडून विविध वर्गवारीनुसार दिव्यांग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील ५५६९ दिव्यांग बांधवांनी १ मार्च २०१७ ते १३ मे २०१७ या कालावधीत दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ३२०० जणांना हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, तर ७२७ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले असून, १६४२ जणांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. जाचक अटींमुळे प्रमाणपत्र वितरणाची गती मंदावल्याचे चित्र आहे.सीएडीएम सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा कधी?केंद्र शासनाने दिव्यांग हक्क कायदा-२०१६ची व्याप्ती वाढवली असून, त्यानुसार हिमोफिलिया, थॅलेसिमिया, सिकलसेल या आजारांचा रुग्णांना लाभ मिळणार आहे; मात्र अद्याप राज्य शासनाने यासंदर्भात सुधारित शासन आदेश निर्गमित न केल्यामुळे, सॉफ्टवेअर फॉर असेसमेंट आॅफ डिसेबिलिटी, महाराष्ट्र (सीएडीएम) सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्यात आली नसून, यामुळे राज्यातील हजारो रक्तविकारग्रस्त रुग्णांना दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.