शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

साहित्याचे नवे आयाम उजळणार

By admin | Updated: May 31, 2016 01:55 IST

दलित आणि ग्रामीण साहित्य वाचकांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही.

पुणे : दलित आणि ग्रामीण साहित्य वाचकांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही. हे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशीलांसह देण्याच्या दृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे शब्दकोशांचे काम हाती घेण्यात आले आहे.विशिष्ट शब्द असलेले साहित्यकृतीतील मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या नोंदीमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या शब्दकोशाचे दोन खंड प्रकाशित झाले असून २००५ सालाच्या पुढील शब्दांची ओळख करुन देण्याच्या दृष्टीने तिसऱ्या खंडाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दलित आणि ग्रामीण साहित्यातील अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग यांमुळे हे साहित्य काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले आहे. या संज्ञा वाचकांना सोप्या शब्दांत समजून घेता याव्यात, लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही. तसेच, या साहित्यामधून जे नवनवीन आणि अपरिचित शब्द मिळतात ते प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने हे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशीलांसह या कोशात देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे संचालक आनंद काटीकर यांनी सांगितले. दलित आणि ग्रामीण साहित्यात वापरण्यात आलेले २००५ सालापर्यंतचे शब्दांचा संग्रह असलेले तीन खंड प्रकाशित झाले आहेत. त्यापुढील शब्दांचा शब्दकोशात समावेश करण्याच्या दृष्टीने काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यासपूर्ण संशोधन करण्यात आले. संज्ञा, संकल्पना यांचे एकत्रीकरण करण्यात आले. गेल्या १० वर्षांमध्ये ग्रामीण आणि दलित साहित्याला नवी दिशा, नवे आयाम प्राप्त झाले आहेत. त्यादृष्टीने शब्दकोशही अद्ययावत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ संपादकांचे मंडळ स्थापन करण्यात आले. या अभ्यास समितीने तीनही खंडांचे परीक्षण करुन सुधारणा सुचवल्या. या सुधारणाही शब्दकोशामध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)