नाना काळे - (लेखक सोलापूर जिल्ह्यातील कासारवाडी येथील योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे प्रमुख आहेत.)दाच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या जेमतेमच पाऊस पडेल असा अंदाज असून खरिपाच्या हंगामात खंडवृष्टी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असला तरी रबीचा हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. खरीप हंगामामध्ये तुरळक वृष्टी दिसत असून, मृगाच्या अखेरच्या टप्प्यात बऱ्यापैकी पाऊस पडेल. त्यामुळे पेरण्या थोड्याशा उशीरा होतील. त्यानंतर देखील खंडवृष्टी असल्यामुळे आॅगस्ट महिना जवळपास कमी पावसाचा जाईल. त्यामुळे खरिपांच्या पिकांना थोडासा धोका संभवत आहे. असे असले तरी रबीचा हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी आनंददायी असून रब्बीच्या हंगामात पाऊस चांगला पडून पेरण्या वेळेवर होवून पिकेदेखील चांगली येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपापेक्षा रबी हंगामावरच लक्ष केंद्रीत करावे. डांबरी रस्ते व काँक्रीटीकरण यामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळेच मी शेती करीत असलेल्या ५५ वर्षांच्या अभ्यासात मागील दोन-तीन वर्षांतच सातत्याने गारा पडल्याचे दिसून आले. नैसर्गिक नियमानुसार जमिनीवर ३५ टक्के भागात जंगल असले पाहिजे. मात्र वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष तोडीवरच सध्या जास्त भर आहे. (लेखक सोलापूर जिल्ह्यातील कासारवाडी येथील योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे प्रमुख आहेत.)
जेमतेम पाऊस
By admin | Updated: June 1, 2015 03:56 IST