शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदाते उठले जिवावर

By admin | Updated: November 23, 2015 02:57 IST

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जन्मदात्यांनी आपल्या मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे. सोलापुरात आपल्या दोन मुलींची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यावर

सोलापूर/नांदेड : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जन्मदात्यांनी आपल्या मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे. सोलापुरात आपल्या दोन मुलींची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यावर एका मातेने स्वत:वरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदेडमध्ये घरात झोपलेल्या ३वर्षीय चिमुकलीचा पित्यानेच गळा दाबून निर्घृणपणे खून केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरा मैल (बसवनगर) येथे भारती पापू राठोड (२७) ही सासू-सासऱ्यांसमवेत राहते. दोन वर्षांपूर्वी तिचा पती पापू राठोड हा अपघातात मरण पावला. रविवारी सकाळी घरी कोणीच नसताना भारतीने मुलगी काजल (७) व सोनाली (५) यांच्यावर धारदार शस्त्राने छाती व पोटावर वार केले. त्यात दोघीही जागीच मरण पावल्या. पतीच्या निधनानंतर सासू-सासऱ्याबरोबर वारंवार भारतीचा वाद होत असे. त्यामुळे ती नेहमी मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उशिराने भारती शुद्धीवर आली तेव्हा ‘मीच माझ्या मुलींना मारले’ असे ती बडबडत होती, असे पोलिसांनी सांगितले.वडिलांनी घोटला ३ वर्षीय मुलीचा गळा नांदेडच्या कंधार तालुक्यातील मरशिवणी गावात शुक्रवारी सकाळी मारोती होणराव (३५) याने पत्नीला सरपण आणण्यास शेतात पाठवून तीन वर्षांची मुलगी शिवकन्याचा गळा आवळला. पत्नी परतली तेव्हा, तिला शिवकन्या ओरडताना दिसली. शिवकन्याला थंडीपासून बचावासाठी घातलेली टोपी काढून पाहिली असता गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसल्या़ हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांच्या मदतीने लेकीला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले़ मात्र रविवारी सकाळी शिवकन्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी मारोतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली.