शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 16:26 IST

खूनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तरप्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी उर्फ गौतम काशिनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) मध्यरात्री चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़

ठळक मुद्देनाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील रुग्ण विभागउत्तर प्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत चादरीच्या साहाय्याने गळफास

नाशिक : खूनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तरप्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी उर्फ गौतम काशिनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) मध्यरात्री चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्यात २००४ मध्ये महंत मोहनगिरी जोशीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात न्यायालयाने महंत जोशी यास १२ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़ गत दहा ते बारा वर्षांपासून मोहनगिरी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते़ त्यांचा बंदी क्रमांक पी़७१ असा होता़महंत मोहनगिरी जोशी या बंदीवानाने गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातील रुग्ण विभागातील शौचालयात आपल्याकडील चादर फाडून स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ ही बाब लक्षात येताच तत्काळ उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ महंत म्हणून ओळख असलेले मोहनगिरी यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना खुल्या कारागृहात ठेवलेले होते़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़