शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणी बेशिस्त

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

झपाट्याने विकसित होणाऱ्या नागपुरात जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढतच आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही,

११ महिन्यांमध्ये ५०० पेक्षा जास्त अपघात नागपूर : झपाट्याने विकसित होणाऱ्या नागपुरात जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढतच आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही, त्यामुळेच लाखमोलाची माणसे रस्त्यांवर किड्या-मुंग्यांप्रमाणे चिरडली जात आहेत. सोमवारी दुपारी एक महिला वकील आणि एक विद्यार्थी असेच चिरडले गेले अन् पुन्हा एकदा अपघाताचा भयावह विषय चर्चा अन् चिंता वाढवणारा ठरला आहे. देशाचे हृदयस्थान आणि संत्र्याचे शहर म्हणून नागपूर शहराची देशभर ख्याती होती. म्हणूनच की काय नागपूर झपाट्याने वाढू लागले. लोकसंख्या वाढली, वाहने वाढली अन् दुर्दैवाने अपघातही वाढले. गेल्या ११ महिन्यांमध्ये नागपुरात ५०० पेक्षा जास्त अपघात घडले. यात २१९ जणांचे बळी गेले. ४ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या २० दिवसांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह १५ जणांचे बळी गेले तर, २५ जण जबर जखमी झाले. अपघातातील मृत आणि जखमींची संख्या बघता उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत त्याचा प्रत्यय येतो. यामुळे नागपूर आता ‘हादसों का शहर’ म्हणून ओळख मिळवते की काय, अशी भीतीदायक स्थिती आहे.(प्रतिनिधी)असून नसल्यासारखेनागपूर शहरात ५०० पेक्षा जास्त चौक आहेत. यापैकी मुख्य मार्गांना जोडणाऱ्या १४३ चौकात सिग्नल आहेत. (त्यातील ३८ नादुरुस्त आहेत.) शहरातील वाहतूक सुरळीत असावी आणि वाहनचालकांनी शिस्तीत वाहने चालवावी, यासाठी चौकाचौकात सिग्नल असतात. वाहतुकीचे नियम मोडणारांना चाप बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही तैनाती असते. मात्र, हे सारेच असून नसल्यासारखे आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चौकात उभे असावे, यासाठी प्रत्येक सिग्नलच्या बाजूला किंवा मध्ये एक छोटीशी पोलीस चौकी असते. झांशी राणी आणि व्हेरायटी चौक आणि आणखी एखाद दुसऱ्या चौकातला अपवाद वगळता कोणत्याच सिग्नलवर पोलीस उभे दिसत नाहीत. ते उभे असतात सिग्नलपासून काही अंतरावर, एखाद्या झाडाच्या आडोशाला. ते चौकात-सिग्नलवर दिसत नसल्यामुळे निर्ढावलेले वाहनचालक भरधावपणे वाहन दामटतात. या बेशिस्त वाहनचालकामुळे दुसऱ्याच कुण्या वाहनचालकाला धोका होतो अन् भलत्याच्याच जीवावर बेतते. सारेच धक्कादायक येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. मात्र, ती खिळखिळी आहे. शहरातील चौकांचा आणि सिग्नलचा विचार केल्यास किमान ११०० पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेला गरज आहे. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांची संख्या केवळ ५७० आहे. त्यांना सांभाळण्यासाठी २५ पीआय आणि पीएसआय आहेत. आजारी आणि साप्ताहिक रजा अन् अन्य संबंधित कारणे लक्षात घेतल्यास यापैकी रोज केवळ ३५० पोलीस प्रत्यक्ष कर्तव्यावर असतात. वाहतूक नियंत्रित करण्यासोबतच शहरात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची (व्हीव्हीआयपींची) वाट मोकळी करून देण्याचीही जबाबदारी याच पोलिसांना सांभाळावी लागते. बेभान होऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या अन् उपद्रव वाढत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांजवळ एकही स्पीड गन (गती मोजणारे उपकरण) नाही, ही सर्वात धक्कादायक बाब आहे. अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला ते महत्त्वाचे नाही. अपघातात लाखमोलाचा जीव जातो, ही बाब लक्षात घ्यावी. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. प्रत्येक वाहनचालकाने शिस्तीने वाहन चालविले तर लाख मोलाचा जीव वाचविणे शक्य आहे. बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. उद्यापासून पोलीस अधिक दक्षपणे आपली जबाबदारी पार पाडतील. बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकविण्यासाठी अन्य वाहनचालकांनीही पुढाकार घेतल्यास अपघात रोखण्याचे आणि वाहतुकीला वळण लावण्याचे महत्त्वाचे काम सहज होऊ शकते. भरत तांगडेपोलीस उपायुक्त वाहतूक शाखा