मनीषा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वृद्धाला केलेली मदत रत्नागिरीतील माजी सरपंचाला महागात पडली. त्यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली, तरी या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण आयुष्य आणि कुटुंबच उद्ध्वस्त झाले, अशी खंत रत्नागिरीच्या ७५ वर्षीय माजी सरपंचाने व्यक्त केली. खोटा आरोप करणाऱ्या तक्रारदारावर तसेच कुठलीही शहानिशा न करता गुन्ह्या दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी आता लढा उभारला आहे. रत्नागिरीच्या राजापूर येथील बुरंबेवाडीत ७५ वर्षांचे अशोक मयेकर कुटुंबीयांसह राहतात. २००४ मध्ये गावातील ६२ वर्षांचे तानाजी कदम यांच्यावर तेथील रहिवासी विश्वनाथ कदम यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला. गावचे सरपंच म्हणून मयेकर यांनी खटला दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला. हाच राग मनात धरत, ३ आॅक्टोबर २००५ मध्ये विश्वनाथच्या पत्नीने मयेकर यांच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार, पुढे राजापूर न्यायालयात त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झाले. अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर २०१० मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, या कालावधीत पद-प्रतिष्ठा दोन्हीही गेले. त्यांना सहकुटुंब गाव सोडावे लागले, असे मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. खोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पोलीस महासंचालकांकडेही त्यांनी न्यायासाठी अर्ज केला आहे.न्यायासाठी लढाखोट्या गुन्ह्यात अडकवणारे, तसेच तक्रारदार यांची कुठलीही चौकशी न करता, गुन्हा दाखल करणारे पोलीस यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मयेकर प्रयत्नशील आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते गेले अनेक दिवस मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.
खोट्या गुन्ह्यामुळे आयुष्यच उद्ध्वस्त...
By admin | Updated: June 6, 2017 05:59 IST