शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीतील जनजीवन पूर्वपदावर

By admin | Updated: July 21, 2016 05:50 IST

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भीतीदायक वातावरण हळूहळू निवळत आहे

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या भीषण प्रसंगानंतर परिसरात निर्माण झालेली दशहत व भीतीदायक वातावरण हळूहळू निवळत असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे़ कोपर्डीसह कुळधरण व कर्जत शहरातील शाळा सुरू झाल्या असून बुधवारी मुलींनीही शाळांत हजेरी लावली़ भीतीपोटी मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते तर मुलींच्या पालकांमध्येही संभ्रम होता. दोन दिवसांपासून परिसरात व्यवहार पूर्वपदावर आले असून, गावासह शेतातील कामेही सुरू झाली आहेत़ घटनेनंतर कोपर्डीतील ग्रामस्थांनीही समजदारपणाची भूमिका घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही़महिला आयोग सरसावलामहिला व मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विजया रहाटकर यांनी बुधवारी कोपर्डीच्या भैरवनाथ मंदिरात सर्व शाळा, महाविद्यालयातील मुली, पालक व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गावात पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांना दिले. बालहक्क आयोगानेही घटनेची दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. गावात एस. टी. बस तातडीने सुरू करण्याचे, कोपर्डी व कुळधरण येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)>महिनाभरात तपास - रश्मी शुक्लाबुधवारी पुणे विभागाच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गावाची पाहणी केली. महिनाभरात तपास करून आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.शुक्ला यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. मी तुमच्याबरोबर आहे. घाबरु नका, असा धीरही त्यांनी पीडित कुटुंबाला दिला. शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील मुलींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी सर्व शाळांना भेटी देणार आहेत. असेही त्या म्हणाल्या.