शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

हवालदाराची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

By admin | Updated: March 1, 2017 05:50 IST

हत्येप्रकरणी मंगळवारी सत्र न्यायालयाने आरोपी संतोष साळवे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

मुंबई : कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार अजय गावंड यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी सत्र न्यायालयाने आरोपी संतोष साळवे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा खटला आठ महिन्यांत संपवण्यात सरकारी वकिलांना यश आले.न्या. एम. डी. देशपांडे यांनी संतोष साळवेला हत्या, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि घरात घुसखोरी करणे इत्यादी गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.‘कर्तव्यावर असलेले पोलीस हे कायद्याचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेला हल्ला अतिशय गांभीर्याने घेऊन आरोपीला कठोर शिक्षा द्यावी,’ अशी मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाला केली.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, १५ नोव्हेंबर रोजी अजय गावंड डोंगरी पोलीस ठाण्यात रात्रपाळीसाठी कर्तव्यावर होते. रात्री अडीचच्या सुमारास त्यांना वाडीबंदर येथील पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोन आला. त्याने एका चोराने सुविधा केंद्राच्या इमारतीत दबा धरल्याचे सांगितले. त्यामुळे गावंड यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. चोर इमारतीच्या गच्चीवर लपून बसला होता. त्याने आतून गच्चीचे दार लावून घेतले होते. गावंड यांनी त्याला आपण पोलीस असल्याचे सांगत शरण येण्यास सांगितले. अनेकवेळा सांगूनही साळवेने गच्चीचा दरवाजा न उघडल्याने गावंड मागील बाजूने गच्चीवर उतरले. त्या वेळी साळवेने त्यांच्यावर लाकडी फळीने प्रहार केले. या हल्ल्यामुळे गावंड यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>