शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत स्वत:पेटवून घेत संपविले आयुष्य

By admin | Updated: June 18, 2017 21:00 IST

नाशिकमधील जेलरोड भागातील एका इसमाने अत्यंत विचित्र पध्दतीने स्वत:चे आयुष्य संपविल्याची घटना घडली आहे. त्याने हातांच्या नस कापून परिसरातील एका मंदिराभोवती जाऊन रक्तबंबाळ अवस्थेत प्रदक्षिणा घातल्या

नाशिक : पंधरा वर्षांपासून घरातून निघून गेलेल्या आणि पाच महिन्यांपुर्वीच पुन्हा घरी परतलेल्या नाशिकमधील जेलरोड भागातील एका इसमाने अत्यंत विचित्र पध्दतीने स्वत:चे आयुष्य संपविल्याची घटना घडली आहे. त्याने हातांच्या नस कापून परिसरातील एका मंदिराभोवती जाऊन रक्तबंबाळ अवस्थेत प्रदक्षिणा घातल्या आणि स्वत:ला पेटवून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत ५९ वर्षीय मानसिक विकृ तीने ग्रासलेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने पोलिसांनी उशीरा सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर इसम हा मानसिक विकृत असल्याची बाब तपासात प्रथमदर्शनी समोर आली आहे. हा इसम भोंदूगिरी करणाऱ्या काही बुवाबाबांच्याही संपकर् ात होता असा संशयही पोलिसांना आहे. यामुळे अशा काही तरी अंधश्रध्देपोटी इसमाने स्वत:च्या हातांच्या नस कापून पेटवून घेत आत्महत्त्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जेलरोड परिसरातील मॉडेल कॉलनी येथील सुभाष रामराव डोईफोडे असे या मयत इसमाचे नाव आहे. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान राहत्या घरात अंगावर स्वत: रॉकेल टाकले आणि इमारतीच्या मजल्यावरून या अवस्थेत खाली उतरून शेजारी असलेल्या एका मंदिराबाहेर पोहचला. त्याचवेळी डोईफोडे याने ब्लेडच्या सहाय्याने दोन्ही हातांच्या नस कापून घेतल्या. हातांमधून रक्त पडू लागले त्याच अवस्थेत त्याने मंदिराभोवती प्रदक्षिणाही मारल्या व स्वत: ला पेटवून घेतले. अचानकपणे मंदिराच्या आवारात आग दिसू लागल्याने परिसरातील नागरिक धावून बाहेर आले; मात्र आग मोठी असल्याने कोणीही त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस केले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. या घटनेमुळे संपुर्ण शहर हादरून गेले आहे. अशा विचित्र पध्दतीने या इसमाने स्वत:चे आयुष्य संपविल्याने हळहळबरोबरच आश्चर्यही व्यक्त होत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.