शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फुलशेतीमुळे आयुष्य बहरले!

By admin | Updated: March 27, 2017 04:02 IST

सव्वा एकर शेतीपैकी १५ गुंठे क्षेत्रात फुलांची शेती करून वर्षाला दोन लाखांवर उत्पन्न मिळवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ

 नाना देवळे / मंगरुळपीर (जि. वाशिम)सव्वा एकर शेतीपैकी १५ गुंठे क्षेत्रात फुलांची शेती करून वर्षाला दोन लाखांवर उत्पन्न मिळवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गणेशपूर येथील राजेंद्र वसंतराव राऊत या शेतकऱ्याने साधली आहे.मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गणेशपूर येथील राजेंद्र वसंतराव राऊत यांच्याकडे वडिलोपार्जित सव्वा एकर शेती आहे. यामधील ३५ गुंठे क्षेत्र हे कोरडवाहू आहे, तर गावालगतच १५ गुंठे क्षेत्रही पूर्वी कोरडवाहूच होते. केवळ शेतीवरच चरितार्थ चालविणे शक्य नसल्यामुळे राजेंद्रचे वडील वसंतराव यांनी मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. राजेंद्रने आयटीआय पदविका घेऊन मंगरुळपीर शहरात मॅकनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली; हे काम करीत असतानाच त्याने १५ गुंठ्यात फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गुलाब, शेवंती, गिलार्डी आणि निशिगंध या फूलझाडांच्या कलमांची लागवड केली. झाडांवर वारंवार फवारणी करून त्यांना वातावरणातील बदलाचा विचार करून वेळोवेळी आवश्यक खते दिली, त्यामुळे त्यांची फूलशेती चांगलीच बहरली. गुलाबाच्या फुलांना दीड रुपया नगप्रमाणे मागणी होऊ लागली, तर निशिगंध, गिलार्डी आणि शेवंतीचा दर्जा चांगला असल्याने त्यांनाही चांगला भाव मिळाला. लग्न सोहळे, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांच्याकडे फुलांची मागणी होऊ लागली. मुस्लीम बांधवांच्या सण, उत्सवातही त्यांचा चांगला व्यवसाय होऊ लागला. महिन्याला सरासरी २० हजार रुपये प्रमाणे अवघ्या १५ गुंठ्यात वर्षाकाठी दोन लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले. येत्या काही दिवसांत शेतीचे क्षेत्र वाढवून फूलशेती वाढविण्याचा व्यापक मनोदय राजेंद्रने बोलून दाखविला.