शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

अरुण दातेंच्या मुलाच्या नशिबी भिकाऱ्याचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 17:36 IST

जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 29 - जीवनाला जगण्याची दिशा देणारे गायक अरुण दाते यांच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यांचा मुलगा संगीत दाते वाकड पुलाच्या खाली भिकाऱ्याचे जिणे जगत आहे. त्यांना आजाराने ग्रासल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. एक चांगल्या घरातील ४८ वर्षीय विषय पुरुष वाकड पुलाखाली गेल्या सहा दिवसांपासून बेवारसरीत्या अन्न-पाण्यावाचून पडून असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलीस नाईक विष्णू नागरे यांना समजली. त्यांनी तात्काळ धाव घेत विचारपूस केली. त्यांना ज्यूस पाजला मात्र ते स्वत:ची ओळख सांगण्यास टाळाटाळ करीत होत.

अखेर विश्वासात घेतल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी सांगितले की मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, ही बाब नांगरे यांनी तात्काळ लोकमतला कळविली. लोकमत प्रतिनिधीने हा व्यक्ती खरेच अरुण दाते यांचे सुपुत्र आहेत का, याची खातरजमा करून त्यांची माहिती घेतली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली.

संगीत अरुण दाते असे माझे नाव असून, मी दातेंचा लहान मुलगा संगीत आहे, असे ते म्हणतात. मला मोठ्या भावाने वडिलांच्या संपत्तीतून बेदखल केले आहे. सुमारे तीन वर्षांपासून पत्नी आणि मी विभक्त झालो आहोत. माझा वांद्र्यातील फ्लॅट होता. तो नुकताचा विकला आहे. हॉटेल व्यवसायासाठी मसाल्यांची चौकशी करण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. जुनी पेठमध्ये जात असताना अज्ञात वाहनाने मला धक्का दिला अन् मी रस्त्यावरच बेशुद्ध पडलो. माझ्या हातातील बॅग माझा, मोबाईल, पाकीट, चेक बुक, एटीएम, बॅगमधील सर्व कागदपत्रे कोणी तरी चोरली.

संगीत म्हणाले, "एका रिक्षा चालकाने १०८ ला फोन करून मला मदत केली. ससूनमध्ये दाखल झालो, तिथे २० दिवस उपचार घेतले. अन् त्यानंतर मी तिथून इथपर्यंत कसा आलो हे मला माहीत नसल्याचे सांगतात. मात्र जेव्हा इथे आलो तेव्हा रिक्षातून तिघा-चौघांनी मला बळजबरीने ढकलून इथे टाकल्याने पायाला जखम झाली आहे. त्यामुळे मी जोरजोरात रडत असताना मला एका भिकाऱ्याने चादर आणि अंथरायला दिले." याबाबत संगीत दाते यांच्या पत्नी मेदीनी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी त्यांचा संगीत यांच्याबरोबर घटस्फोट झाला आहे. त्यांच्याशी माझा काही संबध नसल्याचे सांगितले. याबाबत अतुल दाते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "संगीत यांच्यामुळे कुटुंबीयांना खूप त्रास झाला आहे. त्याचे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्याला कुटुंबापासून खूप वर्षापूर्वी कायदेशीर प्रक्रिया करून विभक्त केले आहे."