शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लिचीचा भाव गगनाला

By admin | Updated: May 23, 2017 03:30 IST

भारतात लिचीचे उत्पादन ज्या मोजक्या भागात होते, त्यात घोलवडचा समावेश आहे. येथील हवामान व पाणी या फळासाठी नंदनवन असून

अनिरूध्द पाटील लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : भारतात लिचीचे उत्पादन ज्या मोजक्या भागात होते, त्यात घोलवडचा समावेश आहे. येथील हवामान व पाणी या फळासाठी नंदनवन असून, उन्हाळ््यात पर्यटक खास तिचा आस्वाद घेण्यासाठी येथे दाखल होतात. मात्र, बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादन घटल्याने लिचीचे भाव गगनाला भिडले आहेत. १५० फळांच्या करंडीसाठी ८०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत. मागील वर्षी हा दर ५०० रुपये होता, तर एका फळाची किंमत ६ ते १० रुपये आहे.लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सीस असून, तिचे मूळ चीनमध्ये आहे. सतराव्या शतकात तिचे भारतात आगमन झाले. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड आणि बोर्डी येथील हवामान तिला सर्वाधिक मानवते. त्यामुळेच हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार तिच्या ८ ते १० जाती आहेत. घोलवड लिची म्हणून प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये अर्ली व लेट असे दोन प्रकार आहेत. बियांपासून वाढलेल्या झाडाला १५ वर्षांनी तर गुटी कलमापासून वाढलेले झाड ७ ते ८ वर्षांनी फळे देते. एका झाडाचे सरासरी उत्पादन ११५ किलोपर्यंत येते. धारणा झाल्यानंतर ५० ते ५५ दिवसांत फळ काढणीस तयार होते. नारंगी रंग जाऊन गुलाबी, लालसर रंग आला की, फळे तयार होतात. मेचा मध्य ते जूनचा पहिला आठवडा काढणीचा हंगाम आहे. बांबूच्या करंड्यात किंवा खोक्यात करंज झाडाचा हिरव्या पाल्यात तिचे पॅकिंग केली जाते. सध्या या फळावर लाल कोळी, साल खाणारी अळी, लालभुंगा, नागअळी आदींचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट होत असल्याने, बागायतदारांनी झाडे छाटण्यास सुरुवात केली आहे. खते व कीटकनाशकांच्या वाढत्या किमती, मजुरीचे वाढीव दर, यामुळे उत्पादन खर्च वाढला असून, गत वर्षी १५० फळांसाठी ५०० रुपयांचा दर या हंगामात ८०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे स्थानिक, तसेच परगावतून या फळांचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या खवयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केवळ धनाढ्य लोकांच्या आवाक्यातील श्रीमंत फळ म्हणून ते आता अस्तित्वात उरले आहे.