शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कंपनीचा परवाना रद्द

By admin | Updated: November 5, 2016 04:48 IST

औषध उत्पादनात नामांकित कंपनीने चक्क नकली औषधांची निर्यात केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या कंपनीचा परवाना रद्द केला

मुंबई : कांदिवली येथील गेल्या ३५ वर्षांपासून औषध उत्पादनात नामांकित कंपनीने चक्क नकली औषधांची निर्यात केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या कंपनीचा परवाना रद्द केला असून, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले प्रमाणपत्रही रद्द केले आहे. ही कंपनी नकली औषधांची निर्यात करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएने अधिक तपास केला. त्यात ही कंपनी नकली औषधांची निर्यात करत असल्याचे उघड झाले. ‘मे. बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड’ असे या कंपनीचे नाव असून, या ठिकाणी टॅब्लेट, कॅप्सूल, इंजेक्शन आणि कर्करोगावरील औषधांचे उत्पादन होते. या कंपनीला जागतिक आरोग्य संघटनेने ‘चांगली उत्पादन पद्धती’ असे प्रमाणपत्र दिले होते. ही कंपनी विविध देशांत औषधांची निर्यातही करते. या कंपनीविषयी मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी दक्षता विभागाच्या सह आयुक्तांच्या अधिपत्याखाली एका चमूने या कंपनीतील औषधांची तपासणी केली. एफडीएने केलेल्या तपासणीत असे उघड झाले की, ‘पॅरासिटमोल टॅब्लेट ५०० एमजी’ची २ लाख ७५ हजार रुपयांची औषधे वडोदरा येथील मे. सिसमेड लॅबोरेटरीज लिमिटेड या उत्पादकाकडून खरेदी करून स्वत: मे. बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी उत्पादित केल्याचे भासविले जात होते. एप्रिल २०१५मध्ये अशाच प्रकारचा ‘पॅरासिटमॉल टॅब्लेट्स ५०० एमजी’ या १३ लाख ७५ हजार रुपयांचा नकली औषधांचा साठा वेस्ट इंडिज येथे निर्यात केला होता. त्याचबरोबर ‘मेटामॉल टॅब्लेट्स ५०० जीएम’ हे औषध मे. सिसमेड लॅबोरेटरीज लि., वडोदरा येथून घेतले होते. पण, स्वत: कंपनीने उत्पादित केल्याचे भासवले जात होते. (प्रतिनिधी)>या प्रकरणी उत्पादकास कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यावर उत्पादकाने दिलेले स्पष्टीकरण आणि त्यास वैयक्तिक सुनावणीची संधी दिली होती, या सर्व मुद्द्यांचा विचार करून उत्पादकाचे उत्पादन परवाने २५ आॅक्टोबरपासून रद्द करण्यात आले. उत्पादकावर कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला आहे.