शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसीचे अधिकारी संशयाच्या घेर्‍यात

By admin | Updated: May 11, 2014 00:06 IST

केंद्र सरकारची जनश्री विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येते. यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या योजनेंतर्गत आलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे.

जनश्री विमा योजना भ्रष्टाचार प्रकरण : आंदोलनाचा इशारानागपूर : केंद्र सरकारची जनश्री विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येते. यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या योजनेंतर्गत आलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेत चौकशी सुरू असून, यात आठ संस्था बनावट आढळल्या आहे. या संस्थांवर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने एलआयसीला १ महिन्यापूर्वी पत्र पाठविले होते. मात्र एलआयसीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एलआयसीच्या अधिकार्‍यांचे दोषींना पाठबळ मिळत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते राजू भुंजे यांनी केला. ९ ते १२ वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना जनश्री विमा योजनेंतर्गत वर्षाला १२०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या एस. बी. बहुउद्देशीय महिला मंडळ, किरण बहुउद्देशीय महिला मंडळ, सुसंस्कार बहुउद्देशीय महिला मंडळ, महाराष्ट्र राज्य महिला संस्था, केअर कल्चरल असोसिएशन फॉर रुरल एज्युकेशन व पराते एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत करोडो रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. या संस्था चंद्रशेखर भिसीकर नावाच्या व्यक्तीच्या असून, या संस्थेतील पदाधिकारी बनावट असल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत आढळले आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गुन्हे शाखेने २६ मार्च २०१४ ला एलआयसीला सहकार्याचे पत्र पाठविले. मात्र एलआयसीने कुठलेही गांभीर्य दाखविले नाही. या प्रकरणाची चौकशी दोन महिन्यात करावी, अशी मागणी राजू भुंजे यांनी पत्रकार परिषदेत केली. अन्यथा संविधान चौकात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.