शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यराणीच्या थांब्याने सहा फेऱ्यांना लेटमार्क

By admin | Updated: December 16, 2015 02:33 IST

मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नाशिककरांची सोय करण्यासाठी मनमाड-एलटीटी राज्यराणी सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आली. मात्र ही ट्रेन सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आल्यानंतर आधीच

मुंबई : मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नाशिककरांची सोय करण्यासाठी मनमाड-एलटीटी राज्यराणी सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आली. मात्र ही ट्रेन सीएसटीपर्यंत सुरू करण्यात आल्यानंतर आधीच लोकल सेवेला फटका बसत असतानाच यात आणखी मोठी भर पडणार आहे. या ट्रेनला ठाणे स्थानकात थांबा नसून प्रवाशांच्या मागणीनुसार तो थांबा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र तसे प्रयत्न झाल्यास आणखी सहा लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागणार आहे. मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नाशिककरांची सोय करण्यासाठीच मनमाड-एलटीटी राज्यराणी ट्रेन १0 मार्च २0१२ पासून सुरू करण्यात आली. या ट्रेनचा नाशिककरांना फायदा झाला असला तरी ही ट्रेन एलटीटीपर्यंत येत असल्याने मनस्तापही सहन करावा लागत होता. अखेर १२ आॅक्टोबरपासून सीएसटीपर्यंत ही ट्रेन चालविण्यास सुरुवात झाली. प्रवाशांच्या मागणीनुसार सीएसटीपर्यंत सेवा चालविण्यात येत असल्याने सध्या दोनपेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. ही सेवा देऊनही प्रत्यक्षात प्रवाशांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचेही समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याआधी एलटीटीपर्यंत धावणाऱ्या या ट्रेनला ठाणे स्थानकात थांबा देण्यात येत होता. मात्र सीएसटीपर्यंत सेवा देताच ठाणे स्थानकाचा थांबा काढून टाकण्यात आला. त्यामुळे काही प्रवाशांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ठाणे स्थानकात या ट्रेनला पुन्हा थांबा देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)30 टक्क्यांपेक्षाही कमी प्रवासी मिळत असल्याने मार्च २0१५ मध्ये मनमाड राज्यराणी ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सीएसटीपासून ही ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रवाशांची असल्याने त्याचा विचार करत ट्रेन बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.