शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फर्ग्यूसन कॉलेजच्या प्राध्यापकांचं विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना पत्र

By admin | Updated: March 23, 2016 12:43 IST

फर्ग्यूसन कॉलेजचे प्राध्यापक रवींद्रसिंग परदेशी यांनी पोलिसांना पत्र लिहून कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. २३ - फर्ग्यूसन कॉलेजचे प्राध्यापक रवींद्रसिंग परदेशी यांनी पोलिसांना पत्र लिहून कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र काही वेळातच प्राध्यापक रवींद्रसिंग परदेसी यांनी आपण पाठवलेल्या पत्रात टाईप करताना चूक झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पत्र लिहिताना 'देशविरोधी' हा शब्द चुकून लिहिला गेला असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
 
फर्ग्यूसन कॉलेजमध्ये मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली होती त्यावेळी कन्हैय्या कुमार आणि जेएनयूच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या.  एबीव्हीपीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील 9 फेब्रुवारीच्या घटनेवर 'जेएनयूचं सत्य' असं चर्चासत्र आयोजित केलं होतं. कार्यक्रम सुरु होताच डाव्या विचारसरणीच्या काही विद्यार्थ्यांनी घोषणा देत हा कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला होता असं विद्यार्थ्यांच म्हणणं आहे. 
 
सध्या परिक्षा सुरु असल्याने कॉलेज प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही एबीव्हीपीने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण आणलं होतं. अजूनपर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.