शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण यांची चौकशी करा सभागृह नेते राजेश मोरेंचे आयुक्त पी.वेलारसू यांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:43 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असून त्याला मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण हे जबाबदार असून त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी, तसेच ज्या अधिका-यांना ३ वर्षे झाली आहेत अशा अधिका-यांना शासनाकडे परत पाठवावे, जेणेकरुन महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी होण्यास सहाय्य होईल अशी मागणी सभागृह नेते राजेश मोरे यांनी आयुक्त पी.वेलारसू यांना केली

ठळक मुद्देनियमानूसार काम केल्याने काही जण दुखावतात- चव्हाण

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असून त्याला मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण हे जबाबदार असून त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी, तसेच ज्या अधिका-यांना ३ वर्षे झाली आहेत अशा अधिका-यांना शासनाकडे परत पाठवावे, जेणेकरुन महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी होण्यास सहाय्य होईल अशी मागणी सभागृह नेते राजेश मोरे यांनी आयुक्त पी.वेलारसू यांना केली आहे.तसे पत्र मोरेंनी मंगळवारी आयुक्तांना पाठवले असून मागील तीन वर्षात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक झालेली आहे, त्यासंदर्भात सातत्याने आवाज उठवला असून त्याचा काहीही परिणाम होत नाही. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतांना त्याची जाणिव चव्हाण यांना नाही. २०१० च्या अर्थसंकल्पाचा आढावा घेतल्यास त्यातील अनेक त्रुटी स्पष्ट होतील. तेव्हाची कामे अजून सुरु असून कामांचा कालावधी संपल्यावरही वाढीव काम असे सांगितले जात आहे. चव्हाण यांच्या कामाची अजब पद्धत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.केडीएमसीची निवड स्मार्टसिटी प्रकल्पात झाली, त्यासाठी पहिल्या टप्प्याचा निधी १५० करोड रुपये प्राप्त झाले. ही रक्कम गुंतवणूक करतांना मार्गदर्शक तत्व काय होती. ती गुंतवणूक करतांना पाळली गेली की नाही? ज्या बँकेत गुंतवणूक केली तिथे व्याजदर हा अन्य बँकांच्या तुलनेत कसा आहे याची तुलना कशी केली गेली याबाबतचा तपशील मिळू शकेल का? अशीही विचारणा मोरेंनी पत्रात केली आहे. असा सर्वांगिण विचार करुन महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत करणा-या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.त्यामुळे जे अधिकारी ३ वर्षांसाठी येतात त्यांची तातडीने बदली करावी, आधीच डबघाईत असलेल्या महापालिकेवरचा बोजा कमी करावा असेही त्यांनी म्हंटले. कोणतीही विकास कामे होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या असंतोषाचा सामना लोकप्रतिनिधींना करावा लागतो. अशा स्थितीमुळे सशक्त लोकशाही कशी होईल असा सवालही त्यांनी केला.- मी शासनाच्या नियमावलीला सुसंगत पद्धतीनेच काम करतो. त्यामुळेच कोणालाही बील देतांना नियमावली पाळावी असा माझा आग्रह असतो, कदाचित त्यामुळेच काहीजण दुखावले जात असतील. माझा केडीएमसीतील कार्यकाळ संपुष्टात आला असून शासनाने बदली केल्यास मी तात्काळ चार्ज सोडेन - दिग्विजय चव्हाण, मुख्य लेखा अधिकारी, केडीएमसी

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण