शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएमए’ने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

By admin | Updated: June 26, 2016 04:14 IST

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर (एमएमसी) रजिस्ट्रार म्हणून आयुर्वेद डॉक्टरची नेमणूक आणि एमएमसीच्या निवडणुका न घेतल्या संदर्भात, इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर (एमएमसी) रजिस्ट्रार म्हणून आयुर्वेद डॉक्टरची नेमणूक आणि एमएमसीच्या निवडणुका न घेतल्या संदर्भात, इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करू देऊ नये, म्हणून अ‍ॅलोपॅथी डॉक्टर न्यायालयात गेले आहेत, तरीही आयुर्वेदिक डॉक्टरची एमएमसीचा रजिस्ट्रार म्हणून अचानक नेमणूक करण्यात आली. एमएमसीच्या सदस्यांना याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती. सरकारने असा निर्णय का घेतला, याविषयी डॉक्टरांमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एमएमसी कार्यालयात रजिस्ट्रार हा पूर्ण वेळ असणे आवश्यक आहे, पण नेमणूक केलेली व्यक्ती ही पोद्दार रुग्णालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि आयुर्वेद, युनानीच्या परिषदेवरदेखील रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे. एमएमसीत सुमारे लाख डॉक्टरांची नोंदणी आहे. राज्यभरातून डॉक्टर एमएमसीत कामासाठी येत असतात. अशा वेळी रजिस्ट्रार येथे नसेल, तर डॉक्टरांचे काम होणार नाही, तसेच एमएमसीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्यात याव्या, यासाठी एमएमसीने पत्रव्यवहार केला होता. त्याला कोणतेही उत्तर राज्य सरकारने दिले नाही. अजूनही निवडणुका झालेल्या नाहीत, तरी या दोन्ही गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे पत्रात नमूद करण्यात आल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)