शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

By admin | Updated: May 23, 2017 01:51 IST

वैद्यकीय अहवालात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत असूनही मुंब्रा पोलीस आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोप करणारे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वैद्यकीय अहवालात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत असूनही मुंब्रा पोलीस आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोप करणारे पत्र तेथील एका कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्रालय व ठाणे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे़ अ‍ॅड़ प्रकाश साळशिंगिकर यांच्यामार्फत पीडित कुटुंबाने हे पत्र लिहिले आहे़ हे कुटुंब शीळ- डायघर पोलीस ठाणे हद्दीत राहते़ भंगार वेचून ते उदरनिर्वाह करतात़ त्यांच्या शेजारी शेट्टी कुटुंब राहते़ शेट्टी कुटुंबाचे नातलग कुर्ला येथे राहतात़ मार्च महिन्यात घरात कोणी नसताना करण शेट्टी माझ्या १४ वर्षीय मुलीला घेऊन गेला़ त्याने तिला कुर्ला येथील त्याच्या नातलगांकडे नेले़ तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला, असा तपशील या पत्रात देण्यात आला आहे. मुलगी हरवल्याची तक्रार या कुटुंबियांनी लगेचच पोलिसांत दिली होती़ त्यानंतर मुलगी करण शेट्टीसोबत गेल्याचे कळाले़ पुढे पाठपुरावा केल्यानंतर मुलीचा ताबा मिळाला़ करणने काही अत्याचार केला का, असे वारंवार तिला विचारले़ मात्र ती खूप घाबरलेली होती़ कोणाला काही सांगशील, तर तुझ्या कुटुंबियांना ठार करू, असे शेट्टी कुटुंबियांनी तिला धमकावले होते़ मुलगी फारसे काही सांगत नसल्याने नंतर मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली़ त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालाद्वारे स्पष्ट झाले़ त्याचा पुरावाच मिळाला. त्यामुळे करणने अत्याचार केला आहे़; त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी वारंवार पोलिसांना केली़ मात्र पोलीस आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत नाहीत़ तुम्हीच आता न्याय द्यावा, अशी विनंती पीडित कुटुंबाने पत्रात केली आहे़