शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रानडे इन्स्टिट्यूटवर ‘लेटरबाँम्ब’

By admin | Updated: May 10, 2016 01:19 IST

एफटीआयआय पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटला ‘लेटर बॉम्ब’ मिळाला आहे. संस्थेला शनिवारी पोस्टाद्वारे आलेले हे पार्सल सोमवारी दुपारी उघडण्यात आले.

पुणे : एफटीआयआय पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटला ‘लेटर बॉम्ब’ मिळाला आहे. संस्थेला शनिवारी पोस्टाद्वारे आलेले हे पार्सल सोमवारी दुपारी उघडण्यात आले. तेव्हा त्यामध्ये डिटोनेटर, स्फोटक पावडरसोबत ‘तुम्ही कन्हैया कुमारला पाठींबा दिला. त्यामुळे आम्ही हाय एक्स्प्लोजिव्ह पाठवत आहोत’ असे पत्र आढळून आले. एफटीआयआयला पाठवण्यात आलेलेच पत्र रानडे इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. रानडे इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. माधवी रेड्डी यांच्या नावाने एक बंद लिफाफा पोस्टाद्वारे आला होता. शनिवारी हा लिफाफा संस्थेला मिळाला होता. मात्र, त्यादिवशी उघडण्यात आला नाही. रविवारच्या सुटीनंतर सोमवारी कार्यालय उघडण्यात आले. दुपारी पत्र पहात असताना हा लिफाफा फोडण्यात आला. तेव्हा आतमध्ये एक डिटोनेटर, स्फोटक पावडर आणि पत्र मिळाले. याबाबत संस्थास्तरावर चर्चा केल्यानंतर संध्याकाळी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. संस्थेच्या पदाधिका-यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात अधिका-यांची भेट घेतली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त टी. डी. गौड पोलीस ठाण्यात आले. संस्थेला आलेले पार्सल ताब्यात घेऊन तपासणीकरिता बॉम्बशोधक व नाशक पथकाकडे पाठवण्यात आले आहे. या दोन्ही घटना आम्ही गांभिर्याने घेतल्या असून आमचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले. हे दोन्ही पार्सल शहरामधूनच पाठवण्यात आले असून त्याचा शोध घेण्यात यशस्वी होऊ असेही ते म्हणाले. एफटीआयआयला आणि रानडे इन्स्टीट्युटला आलेले पार्सल सारखेच असून केवळ पत्ता बदलून पाठवण्यात आले आहे. पत्रावरचा मजकुर इंग्रजीमध्ये असून टंकलिखीत स्वरुपात आहे. डेक्कन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सुरक्षा अधिकारी मारुती भिमराव चव्हाण (वय ५६, रा. मयुर नगरी, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. एफटीआय पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटमध्ये लेटर बॉम्ब आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून विद्यार्थ्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.>रानडे इन्स्टिट्यूटच्या विभाग प्रमुखांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात कन्हैया कुमारला पाठींबा दिलात तर महागात पडेल,अशा स्वरुपाचा मचकूर आहे. सोमवारी दुपारी विभाग प्रमुख माधवी रेड्डी यांनी धमकीचे पत्र आल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागामार्फत डेक्कन पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली आहे.- डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.