शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

होऊ दे चर्चा...

By admin | Updated: October 10, 2014 05:22 IST

नरेंद्रभार्इंनी स्टेजवरच कौतुक केल्यानंतर त्यांचे गाल कसे लाजून अजून टम्म झाले होते ना... अगदी तस्सं !

सचिन जावळकोटे - कभी-कभी मेरे दिल में खयाऽऽल आता है!(‘शमिताभ नामक नव्या पिक्चरमध्ये अमिताभ अन् रेखा पुन्हा एकत्र’ ही बातमी वाचताच बंडूनाना हरखले. त्यांना त्यांच्या तारुण्यातली कॉलेजची पिंकी आठवली. तोंडावर पेपर ठेवून, रेखासारखा दिसणारा तिचा चेहरा डोळ्यांसमोर आणण्याच्या प्रयत्नात बंडूनाना. एवढ्यात त्यांना एक नाजूक हाक ऐकू आलेली.) पिंकी : बंड्याऽऽ बंडू ऽऽ .. ओळखलंस का मला ?बंडूनाना : (दचकून) काऽऽय पिंकी तू... अन् इथं ? मी स्वप्नात तर नाही ना ? एकवेळ ‘सीएम खुर्चीवर उध्दो’ बसलेलंही खरं वाटेल; पण तू साक्षात माझ्यासमोर? थांब चिमटा काढून बघतो. पिंकी : (दंड चोळत) ऊई ऽऽमां... पण मला का चिमटा काढतोयंस? कॉलेजातला वेंधळेपणा गेला नाही वाटतं तुझा अजून. रामदासांसारखं अजूनही या वयात काय भलत्याच गमती-जमती करतोस ?बंडूनाना : (कसंनुसं हसत) हेऽहेऽहेऽ ह्याऽऽ...ह्याऽऽ. तेहतीस वर्षांनंतर तू समोर आलीस; त्यामुळे मीपण देवेंद्रपंतांसारखं हरखून गेलोय. नरेंद्रभार्इंनी स्टेजवरच कौतुक केल्यानंतर त्यांचे गाल कसे लाजून अजून टम्म झाले होते ना... अगदी तस्सं !पिंकी : (वेणीशी चाळा करत लाडिकपणे) आम्हीऽऽ नाही जाऽऽ आता किन्हऽऽई बोलणारच नाही.बंडूनाना : (छाती चोळत) त्या ‘शेट्टीं’नी पण तेव्हा असंच म्हटलं अन् ‘मातोश्री’वर जोरदार कळ आली होती बघ. पण काहीही म्हण, तू अजूनही तश्शीऽऽच दिसतेस सुंदर. काहीच फरक पडला नाही तुझ्यात. आईऽऽगं.पिंकी : (उजव्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरत) तू पण काही कमी नाहीस म्हटलं. फक्त टक्कल अन् पांढऱ्या मिशा एवढाच काय तो फरक. नाहीतरी अमिताभ अजूनही तरणाबांडच वाटतो की या वयात. पुरुषाचं वय नव्हे तर कर्तृत्व बघायचं. ‘थोरल्या काकां’च्या कामाचा झपाटाही तस्साऽऽच बघ.बंडूनाना : (नसलेली छाती फुगून आल्यानं नीट श्वास घेण्याची कसरत करत) मी पण तेच म्हणतोय. जर तेहतीस वर्षानंतर अमिताभ अन् रेखा पुन्हा एकत्र येणार असतील तर आपण काय घोडं मारलंय? (हळूच थोडसं पुढं सरकत) चलऽऽ आपणही युती करू या. पिंकी : (लाजून मागं सरकत) इश्श्ऽऽ. कुणी बघेल नां. उगाच ‘राज-उध्दव’च्या न जुळलेल्या प्रेमासारखा विनाकारण गाजावाजा व्हायला नको.बंडूनाना : (पिंकीची एकेक अदा पाहून अस्वस्थ होत) मग आपण ‘नरेंद्रभाई-थोरले काका’ यांच्यासारखा गुपचूप-गुपचूप संवाद साधू. जानकरांनी नाही का सांगितलं होतं.पिंकी : पण आता नको ना. नंतर कधीतरी भेटू आपण.‘राज’ म्हणाले तसं एकोणीस तारखेनंतरच ‘एकत्र यायचं’ बघू.बंडूनाना : (आवंढा गिळत) अमिताभसोबत काम करायला जर रेखा तयार झाली असेल तर तुझा का मला नकार ? उगाच त्या ‘उध्दों’सारखं नसते आढेवेढे घेऊन हातचं गमावून बसशील.पिंकी : (अजून फुरगंटून) अस्संऽऽ का ? मग निवडणुकीतल्या उमेदवारांसारखं माझ्यासमोर विनवण्या कर बघू. बंडूनाना : (रोमॅँटीक मूडमध्ये गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेत ) ठीकाय. मग ऐक... कभी कभी मेरे दिल में खयाल आता है कि, जिंदगी तेरी जुल्फों की नर्म छांव में गुजरनें पाती तो शादाब हो भी सकती थी...(एवढ्यात बंडूनानांना बायकोचा नेहमीचा दमदार, कणखर अन् मजबूत आवाज ऐकू येतो.) पिंकी : (खेकसत) अहोऽऽ. उठा. दिवाळीच्या तोंडावर गॅस संपलाय. झोपेत काय बडबडताय कभी-कभी... ताबडतोब जाऊन सिलिंडर आणा अभी-अभी !