शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

...त्या मुलांना पेंग्विन बघू द्या!

By admin | Updated: March 25, 2017 02:43 IST

आतापर्यंत पेंग्विन केवळ परदेशात पाहाण्यास मिळत होते. आता ते मुंबईतही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनावर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

मुंबई : आतापर्यंत पेंग्विन केवळ परदेशात पाहाण्यास मिळत होते. आता ते मुंबईतही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनावर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. परदेशात जाऊ न शकणाऱ्या मुलांना त्यांचे दर्शन घेऊ द्या, असे शुक्रवारी उच्च न्यायालयाने म्हटले.द. कोरियातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनना इथले हवामान मानवणार नाही, तसेच भायखळा प्राणिसंग्रहालय त्यांची नीट काळजी घेत नसल्याने त्यांना मायदेशात परत पाठवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका काही वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुडे होती.गेल्या सहा वर्षांत भायखळा प्राणिसंग्रहालयात ४४४ प्राणी मृत्यू पावल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘गेल्या वर्षी ६७ प्राणी गेले. पेंग्विन ठेवण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून एका वर्षाची परवानगी मागितली होती. मात्र, भायखळा प्राणिसंग्रहालयाचे काम पाहून, त्यांनी केवळ सहा महिन्यांचीच परवानगी दिली. ‘जे राष्ट्रीय प्राण्यांची काळजी नीट घेऊ शकत नाहीत, ते परदेशी प्राण्यांची काळजी कशी घेणार,’ असा प्रश्नही अ‍ॅड. सेठना यांनी उपस्थित केला.सिंगापूरमध्ये पेंग्विनची पुरेपूर काळजी घेण्यात येते, मी प्रत्यक्ष पाहिले आहे, असे सेठना यांनी सांगताच, उच्च न्यायालयाने तुमच्याप्रमाणे अन्य लोक परदेशात जाऊन याचा आनंद घेऊ शकत नाहीत, असे म्हटले. ‘तुमच्याप्रमाणे सर्व लोक परदेशात जाऊन पेंग्विनना पाहू शकत नाही. त्यामुळे परदेशात न जाऊ शकणाऱ्या मुलांना त्यांना पाहून आनंद लुटू द्या,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)