शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

चला आळंदीला जाऊ! ज्ञानदेवे डोळा पाहू!

By admin | Updated: November 14, 2014 23:33 IST

ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात सिद्धबेट आळंदी यात्रेस आजपासून सुरुवात होणार आहे.

भानुदास प:हाड  - आळंदी 
चला आळंदीला जाऊ। 
ज्ञानदेवे डोळा पाहू ।। 
ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात सिद्धबेट आळंदी यात्रेस आजपासून सुरुवात होणार आहे. आळंदीतील गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने या सोहळ्यास सुरुवात होणार असून, मुख्य पहाटपूजा मंगळवारी  (दि.18) तर माऊलींचा संजीवन सोहळा 2क् नोव्हेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी अलंकापुरी या दिमाखदार सोहळ्यासाठी सज्ज झाली असून, नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक प्रसाद विक्रेत्यांनी जय्यत तयारी केली आहे.   
कार्तिकी सोहळ्याचा प्रारंभ पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते आज सकाळी सात वाजता गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने केला जाणार आहे. 
यापूर्वी माऊलींची नित्यनियमाप्रमाणो महापूजा करून महाराजांची आरती घेण्यात येईल. पूजेनंतर भाविकभक्तांना मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. आळंदीत आलेल्या प्रत्येक भाविकाला जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधिस्थळाचे सोयीस्कररीत्या दर्शन घेता यावे, यासाठी स्वतंत्र दर्शनबारीची सोय करण्यात आलेली आहे. सुरक्षितता म्हणून दर्शनबारीत तपासणी यंत्र बसविण्यात आलेली आहेत. या यंत्रमधूनच प्रत्येक भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.  मंदिराच्या मुख्य महाद्वारातून मंदिर परिसरात भाविकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला असून, फक्त वीणोकरी, मानकरी, खांदेकरी, दिंडेकरी, वृत्तपत्रंचे पत्रकार व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा पासधारक व्यक्तींना महाद्वारातून मंदिरात प्रवेशास मुभा देण्यात 
आली आहे. 
 
4आजपासून सुरू होत असलेल्या संजीवन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर राज्याच्या कानाकोप:यातून पायीवारी करत असंख्य भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभरातून आलेल्या वैष्णवांचा मेळा आता अलंकापुरीत जमू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ज्ञानियाची नगरी गजबजू लागली आहे. 
4काही दिंडय़ा एक-दोन दिवसांसाठी मुक्कामाच्या ठिकाणी येऊन दाखल झालेल्या आहेत. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशा नामघोषात या दिंडय़ा आळंदीकडे प्रस्थान ठेवत आहेत. रविवारपयर्ंत सर्व पालख्या, दिंडय़ा आळंदीत दाखल होणार आहेत. 
4महाद्वाराच्या ठिकाणी देवस्थानकडून बॅरीगेट लावून प्रवेशाचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. महाद्वाराच्या बाहेर उभे राहून माऊलींचे लांबून दर्शन घेण्याची सोय करण्यात आलेली आहे. या स्थळी महिला व पुरुष कर्मचारी, पोलिसांचा चोख खडा पहारा तैनात करण्यात आलेला आहे. यात्रेसाठी प्रसाद दुकाने, हॉटेल, खेळणीची दुकाने, मनोरंजन व लहान मुलांची करमणुकीची साधने, मनोरंजन कार्यक्रमांचे खेळ मोठय़ा प्रमाणावर थाटण्यात आले आहेत.
 
‘अलंकापुरीच्या विकासाच्या दृष्टीने सादर करण्यात आलेल्या इंद्रायणी नदी संवर्धन योजनेचे महिनाभरात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. त्यानंतर दीड महिन्यात केंद्र शासनाकडे विकासाच्या दृष्टीने पाठपुरावा करून ही कामे मार्गी लावली जातील.’
- शिवाजीराव आढळराव-पाटील खासदार
 
‘संजीवन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर अलंकापुरीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, भाविकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा अधिक कडक स्वरूपात ठेवण्यात येणार असून, भाविकांना कुठल्याही अडचणींचा त्रस होऊ नये, हा आमचा प्रथम उद्देश आहे.’
                    -  विजयकुमार मगर अतिरिक्त पो. अधीक्षक 
 
4गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळय़ात होणार प्रारंभ
4मुख्य पहाट पुजा मंगळवारी (दि.18) रोजी होणार
4माऊलीचा संजीवन समाधी सोहळा 20 नोव्हेंबरला होत असून अवघी अलंकापुरी सज्ज झाली आहे. 
 
4श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा संजीवन समाधिसोहळा अर्थात कार्तिकी उत्सव सात दिवस चालणार आहे. राज्याच्या कानाकोप:यातून असंख्य भाविकभक्तांची मांदियाळी हा आनंददायी सुखसोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यासाठी अलंकापुरीत दाखल होऊ लागली आहे. त्यामुळे शहरात राहुटय़ा, तंबू उभारून वारकरी स्थान मांडू लागले आहेत. चालू वर्षी भाविकांच्या उपस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 
4संजीवन सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर आज खासदार शिवाजी आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी पोलीस प्रशासनाचा आढावा घेत भाविकांच्या सुरक्षिततेबाबतच्या केलेल्या  उपाय- योजनांची पाहणी केली. इंद्रायणी नदी संवर्धन योजनेचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले साहित्य पोलीस प्रशासन, नगरपरिषदेला वितरीत करण्यात आले असून, पुढील सात दिवसांचा आराखडा या वेळी आखण्यात आला. 
4पवित्र इंद्रायणी नदीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्या योजनेचे प्रयामो कंपनीने सादरीकरण केले. या प्रस्तावामध्ये इंद्रायणी शुद्ध करणो, नदीला मिळणारे ओढे-नाले शुद्ध करणो, नवीन घाट बांधणो, मलनि:सारण प्रकल्प करणो, कचरा व्यवस्थापन करणो, नवीन शौचालय बांधणो, बगिचा विकास करणो आदींची तरतूद करण्यात आली आहे. 
 
     ‘कार्तिकी सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाविकांसाठी आरोग्य, स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापन यांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी मोफत स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली असून, त्याचा वापर भाविकांनी करावा. सात दिवसाच्या यात्रेत कुठल्याही समस्या भाविकांना उद्भवणार नाहीत याची आम्ही पूर्णपणो काळजी घेणार आहोत. भाविकांनी कुठल्याही अडचणी उद्भवल्यास नगरपरिषदेकडे अथवा शेजारील मदत केंद्राकडे संपर्क साधावा. 
           - विनायक औंधकर 
(मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद)