शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजपाचे समर्थन काढून घेऊ!

By admin | Updated: April 20, 2016 05:43 IST

कसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले होते, ते पूर्ण होत नसल्याने राज्यातील १५०हून अधिक मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले होते, ते पूर्ण होत नसल्याने राज्यातील १५०हून अधिक मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र मुस्लीम संघाने नाराजी व्यक्त केली आहे. तीन महिन्यांत सरकारने अजेंड्यावरील मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर सरकारला दिलेले समर्थन काढून घेऊ, असा इशारा संघाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांत एकदाही भेटीसाठी वेळ दिला नसल्याची नाराजी संघाचे मुख्य संयोजक फकीर मोहम्मद ठाकूर यांनी व्यक्त केली. ठाकूर म्हणाले, ‘निवडणुकांआधी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या मध्यस्थीनंतर मुस्लीम समाजासाठी काम करणाऱ्या १५०हून अधिक संस्था आणि संघटनांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी मुस्लीम समाजाच्या अनेक प्रश्नांसह मेहमुदूर रेहमान समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र, त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप सरकारने केलेली नाही. संघाचे ३२ जिल्ह्यांतील प्रतिनिधींची मंगळवारी बैठक झाली. त्यात प्रत्येक सदस्याने मनातील खदखद व्यक्त केली. अल्पसंख्यांक समाजासाठी सरकारने सुरू केलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारावर सर्व सदस्यांनी ताशेरे ओढले. उच्चशिक्षण घेणाऱ्या शेकडो मुस्लीम तरुण विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने, परीक्षेला मुकावे लागत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. दुष्काळग्रस्तांसाठी पुढाकारराज्यातील मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळग्रस्त गावांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र मुस्लीम संघ निधी गोळा करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्यासाठी मुस्लीम समाजातील उद्योजक आणि व्यावसायिकांना आवाहन केले जाईल. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी संघ एक गाव दत्तक घेणार असून, सध्या तात्पुरत्या स्वरूपात अधिकाधिक दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)