शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

आता रडून नव्हे, लढून संघर्ष करू या!

By admin | Updated: April 23, 2016 04:01 IST

आत्मविश्वास गमावून खचून जाऊ नका. तुम्हाला रडून नव्हे, तर लढून संघर्ष करायचा आहे. तुमच्या पाठीशी यशस्विनी सामाजिक अभियान खंबीरपणे उभे आहे

अंबाजोगाई : आत्मविश्वास गमावून खचून जाऊ नका. तुम्हाला रडून नव्हे, तर लढून संघर्ष करायचा आहे. तुमच्या पाठीशी यशस्विनी सामाजिक अभियान खंबीरपणे उभे आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री व मदत तत्काळ केली जाईल, अशा शब्दांत खा. सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक विधवा महिलेचे मनौधेर्य वाढविले. येथील मानवलोकच्या सभागृहात यशस्विनी सामाजिक अभियानच्या वतीने गुरुवारी रात्री मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचा मेळावा घेण्यात आला. गरजू महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी, शेळ्या, म्हशी यांचे वाटप करण्यात आले; शिवाय ज्या विधवा महिलांची मुले पुणे व इतर शहरांत शिक्षणासाठी तयार असतील तर त्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिले. खासगी सावकाराकडून कर्ज फेडणे शक्य होत नाही म्हणून आमच्या घरधन्याने स्वत:ला संपविले. सावकाराच्या कर्जानेच आमचे कुंकू पुसले, अशा व्यथा अनेक महिलांनी मांडल्या. शासनाने दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी राहावे : उस्मानाबाद : मराठवाड्यातील नागरिक तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. हंडाभर पाण्यासाठी रात्री-बेरात्री जागणाऱ्या महिला, अबाल-वृद्धांचा दुष्काळाशी लढा सुरू आहे. शासनाने दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.शासन असंवेदनशील : लातूर : मराठवाड्यात विशेषत: लातूरमध्ये भयावह स्थिती आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. यावर केंद्र व राज्य शासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. दुष्काळाबाबत राज्य आणि केंद्र सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.