शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीशी आघाडीचा विचार व्हावा

By admin | Updated: September 20, 2016 02:13 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे १०० नगरसेवक निवडून येतील, असे सांगून काँग्रेसला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पिंपरी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे १०० नगरसेवक निवडून येतील, असे सांगून काँग्रेसला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना खीळ बसावी, असे राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा गंभीरपणे विचार व्हावा, अशी मागणी एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस पक्ष कमकुवत केला असल्याचेही म्हटले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना ऊत आला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा केला. महापालिकेत नगरसेवकांच्या जागा १२८ आहेत. राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून आल्यास आघाडीत काँग्रेसला किती जागा देणार, असा प्रश्न उपस्थित होतो. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याची आठवणही त्यांनी पत्रात करून दिली आहे.गेल्या एक-दोन वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला संपविण्याची विधाने करत होते. स्थानिक पातळीवर पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांना गाफील ठेवण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न होत आहे. काँगे्रसमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याबाबत सकारात्मक नसून, त्यांच्या मनात संभ्रम आहे. पक्षातील सर्वांची मते आजमावून मगच आघाडीचा निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)