शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात १५ विधेयके मांडणार

By admin | Updated: July 13, 2015 01:23 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १५ विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १५ विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले, विरोधकांनी कामकाजात अडथळे आणू नयेत, कारण महत्वाची अशी १५ विधेयके मांडण्यात येणार आहेत. आम्ही कोणत्याही मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यास तयार आहोत.अधिवेशनात मांडण्यात येणारी विधेयके अशी-मासेमारी गलबतांना अनुज्ञप्ती देणारे सागरी मासेमारी विधेयक, खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील फी आकारणी व प्रवेश याचे नियमन करणारे विधेयक, जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व सभापती यांच्या निवडणुका लढवताना जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीतून सूट देणारे विधेयक, नागरिकांना विशिष्ट कालावधीत सेवा देण्याबाबतचे विधेयक, अनधिकृतपणे गौण खनिज काढण्यावर निर्बंध आणण्याबाबचे विधेयक, बाजार समित्यांवर तज्ज्ञांची नियुक्ती करण्याबाबतचे विधेयक, व्यवसाय करण्यात सुलभता आणण्याकरिता काही सवलती देण्यासंबंधीचे विधेयक, ५०० चौ.फू. क्षेत्रफळ असणाऱ्या लहान गाळे किंवा इमारती यांच्या मालमत्ता कराचा आकार पुढील पाच वर्षे कायम ठेवण्याबाबतचे विधेयक, महिला कामगारांना सुरक्षित व सुखकर काम करण्याकरिता काही सवलती देण्यासंबंधीचे विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, डिव्हीओ पायरेटस यांच्यावर कारवाई करणाऱ्या विधेयकाची व्याप्ती वाढवून वाळू माफियांवर जरब बसवण्याबाबतचे विधेयक व विनियोजन विधेयक अशी प्रमुख विधेयके मंजूर केली जाणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)