शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देणार

By admin | Updated: April 5, 2017 00:59 IST

महापालिका निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) त्रुटीबाबत जनआंदोलन सुरू झाले

पुणे : राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) त्रुटीबाबत जनआंदोलन सुरू झाले आहे. ईव्हीएम मशीनविरोधी कृती समितीच्या वतीने त्याविरोधात आता कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यासाठी मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असून, त्याविरोधात दाद मागण्यासाठी लवकरच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येईल, असे समितीचे मार्गदर्शक तेहसीन पूनावाला यांनी येथे सांगितले.उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर ईव्हीएम मशीनबाबत देशपातळीवर आवाज उठवला जात असून, अनेक राष्ट्रीय नेतेदेखील त्यामध्ये उतरले आहेत. याबाबत सर्वांत प्रथम पुण्यात ईव्हीएम मशीनविरोधी कृती समितीच्या वतीने आवाज उठवून आंदोलन सुरू केले गेले. यामध्ये पुण्यातील निवडणुकीत पराभूत व ईव्हीएम मशीनमुळे फटका बसलेले दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, रूपाली ठोंबरे-पाटील, विकास दांगट, मिलिंद काची, दत्ता गायकवाड यांच्यासह इतर अनेक उमेदवारांनी एकत्र येऊन ही समिती स्थापन केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसंबंधातील कागदपत्रे मिळावीत, यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त जे़ एस़ सहारिया यांची मुंबईत कृती समिती भेट घेणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले़ (वार्ताहर)>गुन्हे दाखल कराभारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासोहब आंबेडकर, तेहसीन पूनावाला, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेत निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा, चुकीचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत व बहुसदस्य प्रभाग पद्धत रद्द करावी, अशी मागणी समितीने केली आहे.