शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना धर्मपरंपरेचे पालन करू द्या - दर्डा

By admin | Updated: August 12, 2015 01:46 IST

भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ नुसार जैन समाजाच्या संथारासह सर्व धर्मपरंपरांचे पालन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. देशातील सर्व नागरिकांना धर्मपरंपरेचे पालन करू द्या,

मुंबई : भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ नुसार जैन समाजाच्या संथारासह सर्व धर्मपरंपरांचे पालन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. देशातील सर्व नागरिकांना धर्मपरंपरेचे पालन करू द्या, असे आवाहन सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी केले आहे.जैन समाजाच्या संथारा या धार्मिक व्रतावर बंदी आणण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने संथारा या मृत्यूपर्यंत उपवास व्रताला बेकायदेशीर ठरवत कलम ३०६ आणि ३०९ नुसार आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येला प्रोत्साहन मानले आहे. आजच्या आधुनिक समाजात संथाराला आत्महत्येसारखे ठरविले जात असेल, मात्र इतिहासात डोकावता हे व्रत पवित्र मानले आहे. त्यात आत्मशुद्धी असून निर्वाणासाठी केलेला त्याग दिसून येतो. जैन धर्माचा तो कायम अंत:स्थ भाग राहिला आहे, असेही खा. दर्डा यांनी स्पष्ट केले. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. (प्रतिनिधी)