शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

त्या सर्व नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू

By admin | Updated: July 20, 2016 06:13 IST

कोपर्डी; जि.अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे प्रकरण सरकारने अतिशय गांभीर्याने घेतले आहे

मुंबई : कोपर्डी; जि.अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे प्रकरण सरकारने अतिशय गांभीर्याने घेतले असून, या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देतानाच, या प्रकरणात तातडीने आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.कोपर्डीच्या घटनेवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज वादळी चर्चा झाली. विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत, अवैध दारूवाल्यांना आळा घालण्याची जोरदार मागणी केली. चर्चेला उत्तर देताना, अवैध दारू तयार करणे आणि विक्रीच्या गुन्ह्यात सध्या तीन वर्षांची शिक्षा दिली जाते. ही शिक्षा दहा वर्षांची करण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्डीतील पीडित मुलीच्या कुटुंबातील महिला आणि गावातील, तसेच परिसरातील महिलांच्या भावना समजून घेण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला त्या ठिकाणी जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारच्या वतीने अ‍ॅड.ऊज्ज्वल निकम बाजू मांडतील. घटनेचे साक्षीदार नसले तरी डीएनएचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्यासाठी ते जलदगती न्यायालयाकडे सोपविण्यात आले असून त्याची सुनावणी नियमित घ्यावी. तिला स्थगिती देऊ नये अशी विनंती उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जलदगती न्यायालयाला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.कोपर्डीच्या घटनेत आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी एका शिंदे नामक व्यक्तीचाही सहभाग असून त्याचा संबंध पूर्वी एका कथित खून प्रकरणाशी असल्याचेही म्हटले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चवथ्या व्यक्तीविरुद्धही कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षकांनी लगेचच भेट दिली. त्याचबरोबर पालकमंत्री राम शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही भेट दिली.मी आधी रशियाचा दौरा, नंतर आषाढीनिमित्त पंढरपूर, लगेच मुख्यमंत्री परिषदेसाठी दिल्लीला गेल्याने जाऊ शकलो नाही तरीही तेथील प्रत्येक बाबीची जातीने माहिती घेत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोपर्डीतील घटनेच्या निमित्ताने जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व समाजघटकांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)>आरोपपत्र तातडीने न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या प्रमुख पाच डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले असून, डीएनए अहवालासह न्यायवैद्यक पुरावे पुढील पाचसहा दिवसांत गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या आधारे आरोपपत्र तातडीने दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.