शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीयन्सनी दिले शिक्षणाचे धडे!

By admin | Updated: July 4, 2016 02:25 IST

ज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या गरीब वस्त्या गाठून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले.

मुंबई : ज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या गरीब वस्त्या गाठून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. शैक्षणिक ज्ञानासोबतच त्यांच्यातील कलागुणांनाही आयआयटीयन्सनी नवी ओळख मिळवून दिली.आयआयटी मुंबईतर्फे ‘अभ्युदय आयआयटी’ नावाची सेवाभावी संस्था काम करते. या अंतर्गत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. ही संस्था विद्यार्थ्यांमार्फत चालविली जाते. यंदा ‘वॉलिंटीअर्स वीकेंड’ या उपक्रमांतर्गत आयआयटीचे २० विद्यार्थी अंधेरी पूर्व कॅनोसा शाळा परिसरातील आणि जोगेश्वरी पूर्वेकडील काही चाळींमध्ये गेले होते. तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करीत त्यांना अनेक विषय सोप्या पद्धतीने उलगडून दाखवले. शिवाय प्रत्येक मुलामधील कलागुणांना ओळखून ती कला वाढावी यासाठी त्याविषयीचे मार्गदर्शन केले. आतापर्यंत या दोन विभागांत पाच सत्रे राबविली असून, इतरही वस्त्यांमध्ये उपक्रम करण्याचा आयआयटीयन्सचा मानस आहे. मुलांसोबतच काही काळ वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत घालवण्यासाठी लवकरच नव्या उपक्रमाचे आयोजन आयआयटी अभ्युदय सेवाभावी संस्था करणार आहे. (प्रतिनिधी)