शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तेलबियांकडे शेतक-यांची पाठ!

By admin | Updated: January 23, 2016 02:01 IST

अमरावती विभागातील स्थिती ; केवळ आठ टक्के क्षेत्रावर पेरणी.

दादाराव गायकवाड/कारंजा लाड (जि. वाशिम): बदलत्या वातावरणासह कमी होणार्‍या मागणीमुळे तेलबियांच्या पेरणीकडे अमरावती विभागातील शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे कृषी विभागाच्या गत दोन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.गतवर्षीप्रमाणेच यंदाही सरासरी २६ हजार ४00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार १00 हेक्टरवर तेलबियांची पेरणी करण्यात आली असून, हे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. अमरावती विभागात पूर्वी तीळ, जवस, करडई, कारळ, सूर्यफूल, भुईमूग आदी तेलवाणांचा पेरा मोठय़ा प्रमाणात होत असे. गळित हंगामात सूर्यफुलांनी बहरलेली पिवळी शेते सर्वत्र दिसायची; परंतु मागील काही वर्षांपासून सर्व सोयी-सुविधा असतानाही बदलत्या निसर्गचक्रामुळे कृषिव्यवसाय बेभरवशाचा झाला आहे. याचा अनिष्ट परिणाम पारंपरिक पीकपेरणीवर होत असल्याचे दिसून येते. गत तीन वर्षांपासून अमरावती विभागात अत्यंत कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले असून, शेतकरी आता पेरणी करून आणखी धोका पत्करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नसल्याचे पीकपेरणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गतवर्षी अमरावती विभागात सरासरी २६ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी अपेक्षित असताना केवळ २ हजार २00 हेक्टरवर पेरणी झाली. यंदाही केवळ २ हजार १00 हेक्टर क्षेत्रावरच शेतकर्‍यांनी तेलबियांची पेरणी केल्याचे कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. गतवर्षी करडईची पेरणी १ हजार ४00 हेक्टरवर झाली; यंदा मात्र केवळ ७00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकंदर, अमरावती विभागातील बदलते वातावरण, घटत चाललेली मागणी आणि नगण्य दरामुळे तेलबियांच्या पेरणीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जवसाची पेरणीच नाहीगत दोन वर्षांत अमरावती विभागात एक हेक्टरवरही जवसाची पेरणी करण्यात आलेली नाही. यावरून हे तेलवाण नामशेष होत असल्याचे दिसत आहे. तिळाचेही प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले असून, मागील दोन्ही वर्षांत प्रत्येकी २00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाचा विचार करता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीक्षेत्रात ६00 हेक्टरची वाढ झाली आहे. तथापि, १४ हजार हेक्टरपैकी केवळ ८00 हेक्टरवर या तेलवाणाची पेरणी झाली असून, त्याच्या पेरणीचे प्रमाण केवळ सहा टक्के आहे.