शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:40 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे.

- राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या तातडीच्या दहा हजार रुपये पीककर्जाकडे शेतकऱ्यांनी अक्षरश: पाठ फिरविली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने या कर्जासाठी मागणी केलेली नाही. खरीप पेरणीचा हंगाम संपत आला आहेच पण त्याबरोबर या कर्जासाठी बाँड द्यावा लागत असल्याने प्रतिसाद मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना निकषांच्या आधारे दहा हजार रुपये बियाणे व खते खरेदीसाठी देण्याचे आदेश जिल्हा बँका व राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे कोट्यवधी रुपये बँकेत पडून असल्याने सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने दहा हजार रुपये देण्यास आढेवेढे घेतले; पण सरकारने समज दिल्यानंतर रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला; पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने या रकमेची उचल केलेली नाही. गेल्या आठवड्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील विभागीय सहनिबंधक, व जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, कोकण विभागातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांनी थोड्या फार प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून दहा हजार उचलीला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. १५ जुलैपर्यंत उर्वरित विभागातून केवळ २२०० शेतकऱ्यांनीच कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले आहे.