शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छते’कडे ३४ गावांची पाठ

By admin | Updated: August 2, 2016 03:03 IST

हागणदारीमुक्त गाव मोहिमेच्या जनजागृतीसाठी रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

उरण : हागणदारीमुक्त गाव मोहिमेच्या जनजागृतीसाठी रायगड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांत उरणमधील ३४ ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. मात्र लोकसहभागाअभावी स्वच्छ ग्राम योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात स्वच्छतागृहांअभावी ग्रामीण भागातील महिलांची कुचंबणा होत आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून उरण तालुक्यात गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या मदतीने ३४ ग्रामपंचायतीमध्ये हागणदारीमुक्त गाव योजनेअंतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र या उपक्रमास लोकसहभागाअभावी अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव संकल्पनेला ब्रेक लागला आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने यंदा वार्षिक कृती आराखडा तयार केला असून चालू वर्षात सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये शौचालय उभारण्यात येणार असून १० कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडे पडून आहे. शौचालय नसलेल्या नागरिकांना सरकारतर्फे शौचालय बांधण्यासाठी १२ हजारांचे अनुदानही देण्यात येते. शाळा, कॉलेजमध्ये जनजागृतीसाठी वादविवाद, वक्तृत्त्व, निबंध आदी स्पर्धा घेतल्या जातात. गाव पातळीवर बैठका, मासिक सभा घेतल्या जात असल्या तरी लोकसहभागाअभावी योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. >गावातील कुटुंब सदस्य संख्यापैकी १० टक्के कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असतील व कोणी उघड्यावर जात नसेल तर अशी ग्रामपंचायत हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात येते. यासाठी शासनाच्या सूचनेनुसार योजनेचे काम सुरु आहे.- शैलेश पेंडकलकर,गट समन्वयक