शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

पुणे शहरात जूनमध्ये २१ वेळा सरासरीपेक्षा कमी पाऊस

By admin | Updated: June 30, 2016 19:49 IST

मान्सूनने कोकणासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असली तरी पुणे शहर व परिसरात जून संपला तरी अजून मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे़.

५० वर्षांतील स्थिती : २०१४ ला केवळ १३़८ मिमीविवेक भुसेपुणे : मान्सूनने कोकणासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असली तरी पुणे शहर व परिसरात जून संपला तरी अजून मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे़. यंदा जूनमध्ये पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा निम्माही पाऊस झाला नाही़ गेल्या ५० वर्षांतील वेधशाळेतील आकडेवारी पाहिली असता पुणे शहरात जूनमध्ये सरासरीपेक्षा २१ वेळा कमी पाऊस पडला आहे़ त्यामध्ये २०१४ मध्ये सर्वात कमी १३़८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ .

पुणे शहरात जून महिन्यात सरासरी १३७़७ मिमी पाऊस पडतो़ यंदा ३० जूनअखेरपर्यंत ५९ मिमी पाऊस झाला आहे़ हा गेल्या ५० वर्षातील आठव्या क्रमांकाचा निचांकी पाऊस झाला आहे़ गेल्या ५० वर्षात केवळ ४ वर्षी ५० मिमीपेक्षा पाऊस जूनमध्ये झाला होता़ याअगोदर २०१२ आणि २०१४ तसेच १९७४ आणि १९७२ मध्ये जून महिन्यात ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला होता़ या सर्व वर्षी वर्षभरातील पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडला होता आणि ही सर्व वर्षे तीव्र दुष्काळाची म्हणून गणली गेली होती़. 

हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा १०३ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे़ हा अंदाज संपूर्ण देशासाठी असला तरी जूनमध्ये सरासरीच्या ८७ टक्के इतका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून जुलै आणि आगस्टमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ पण, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात यंदा जूनमध्ये अतिशय कमी पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर पावसाचे दिवस दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत़

आदल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि जूनमध्ये पावसाने दिलेली ओढ यामुळे धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे़ पुणे शहराचा सरासरी पाऊस ७६० मिमी आहे़ गेल्या वर्षी सरासरीपेक्षा थोडा जास्त (८२९ मिमी) पाऊस झाला होता़ पण, वाढते शहरीकरण आणि अन्य शहरांसाठी धरणातून पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय यामुळे यंदा २८ जूनअखेर खडकवासला धरणात १़५४ टीएमसी पाणीसाठा होता़ अशीच स्थिती २०१२ ला १़१२, २०१० ला १़१७ आणि २००९ मध्ये ़७२ टीएमसी पाणीसाठा धरणात होता़ यंदा इतकी यापूर्वी पाण्याची इतकी आणीबाणीची स्थिती यापूर्वी कधी उद्भवली नव्हती़ ---* १९९१ मधील जूनमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ५२९़.५ मिमी पाऊस झाला होता़ वर्षभरात झालेल्या एकूण पावसापैकी त्यावर्षी निम्मा पाऊस जूनमध्ये पडला होता़

* पानशेत धरण १२ जूलै १९६१ फुटले होते़ त्याला कारणही त्यावर्षी जूनमध्ये झालेला पाऊस कारणीभूत ठरला होता़

* २६ जून १९६१ रोजी पुणे शहरात एकाच दिवशी सर्वाधिक १३१़.९ मिमी पावसाची नोंद झाली होती़

जूनमध्ये सर्वांत कमी पाऊसवर्षपाऊस (मिमी)२०१४     १३़.८२०१२    ३४़ ५२००१    ७८़ ६१९९८    ९५़ ७१९९२    ८५़ .८१९८८     ६७़ .०१९८७     ७२़ .७१९८२     ५४़ .११९७४    १९़ ७१९७३     ७४़.४१९७२   ३५़.४१९७१   ६५़.९१९७०    ८४़ .४

जूनमध्ये कमी पावसाचा वार्षिक पावसावर परिणामजूनची पुणे शहरातील सरासरी १३७़७ मिमी आहे़ पुणे शहरात जूनमध्ये ज्या वर्षी कमी पाऊस पडला, त्यातील काही वर्षांचा अपवाद वगळता बहुतांश वर्षी पावसाने सरासरी गाठलेली दिसून येत नाही़ त्यावर्षी राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती़ १९७० ते १९७४ अशी सलग ४ वर्षे जूनमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़ त्यामध्ये सलग १९७० ते ७२ अशा तीन वर्षी दुष्काळी स्थिती होती़ १९७२ मध्ये ३८८़२ हा वर्षभरात पडलेला पुणे शहरातील सर्वात कमी पावसाचे वर्ष ठरले आहे़ ..............

सर्वाधिक पावसाची वर्षे (जून महिना)वर्षे पाऊस (मिमी)२०१३     २६१़२०११    २५६़२०१०   २८६़२००५   २९२़१९९७ २८७़१९९४ ३१३१९९१ ५२९़१९८६ २६४१९८० २५९़१९७६ २७१़