शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कुष्ठरोग निवारणात महाराष्ट्र देशात पिछाडीवर

By admin | Updated: September 19, 2015 22:58 IST

कुष्ठरोग निवारणासाठी आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. तपासणी व औषधोपचार केंद्रांच्या माध्यमातून कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविण्याच्या

- नितीन गव्हाळे,  अकोलाकुष्ठरोग निवारणासाठी आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. तपासणी व औषधोपचार केंद्रांच्या माध्यमातून कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. तरीही कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अपयश येत असल्याचे राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालावरून दिसून येते. कुष्ठरोग निवारणामध्ये देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रात गतवर्षी कुष्ठरोगाची १0 हजार ८१३ प्रकरणे आढळून आली होती. २0१५मध्ये ती संख्या ११ हजार ३७९वर पोहोचली. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, केरळ, कर्नाटक, आसाम या राज्यांचा विचार केला, तर रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आल्याचे दिसून येते. देशामध्ये कुष्ठरोगाचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात आहे.कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार आहे. ग्रामीण भागामध्ये आजाराविषयी अज्ञान असल्याने, नागरिक खबरदारी घेत नाहीत. कुष्ठरोगाची बाधा झाल्यानंतरही अनेक जण उपचार घेत नाहीत. रुग्ण शोधून काढून त्यांच्यावर उपचार करावे लागतात. आदिवासीबहुल भागात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. बी.एल. माने, साहाय्यक उपसंचालक, आरोग्यसेवा कुष्ठरोगसर्वाधिक कुष्ठरुग्ण असणारी राज्येराज्य२0१४२0१५ उत्तर प्रदेश१४४२८१४0९९महाराष्ट्र१0८१३११३७९बिहार१0१00१0३२८प. बंगाल८२४२९0५४कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविणारी राज्येराज्य२0१४२0१५गुजरात५२८२४८५0राजस्थान१२३७११४७तामिळनाडू२९९३२८८८ओडिशा६४0५५४२३केरळ८३९७0४कर्नाटक२८00२७२६ आसाम९६५८५८मध्य प्रदेश५३९९५९२२गुजरात५२८२४८५0आंध्र प्रदेश२७५३३१२९