शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘लेपर्ड सफारी पार्क’ चाकण की आंबेगव्हाणला?

By admin | Updated: August 26, 2016 01:11 IST

'लेपर्ड सफारी पार्क' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चाकण येथे करण्याच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नितीन ससाणे,

जुन्नर- महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर जुन्नर तालुक्याला मानाचे स्थान मिळवून देणार असलेल्या आंबेगव्हाण येथील नियोजित 'लेपर्ड सफारी पार्क' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चाकण येथे करण्याच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याची चर्चा आहे. नुकतीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाकण आंळदी रस्त्यावरील वन विभागाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष जागेची पाहणी, चाचपणी केल्याची चर्चा आहे. चाकण येथील प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांत जुन्नर येथील मुख्य कार्यालयात दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी लेपर्ड सफारी पार्क हा प्रकल्प तालुक्यात पर्यटनसंवर्धनासाठी आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत या प्रकल्पाबाबत आमदारांची बैठक झाली होती. त्यानुसार ओतूर परिसरातील आंबेगव्हाण येथे लेपर्ड सफारी पार्क निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी आंबेगव्हाण येथे जागेची निवड व तत्सम प्रशासकीय कार्यवाही वन विभागाने सुरू केलेली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही राजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, मागील काही दिवसांत हा नियोजित प्रकल्प खेड तालुक्यातील चाकण येथे वन विभागाच्या क्षेत्रात करण्याबाबत वन विभागाने प्रशासकीय कार्यवाही सुरू केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. >सेंट्रल झू आॅथॉरिटीकडून प्रत्यक्ष पाहणी, काटेकोर निकषांची पूर्तता यानंतरच या प्रकल्पाच्या जागेवर शिक्कामोर्तब होईल.लेपर्ड सफारी पार्कमध्ये जंगली अधिवासात मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याचे दर्शन पर्यटकांना बंदिस्त वाहनात बसून घेता येणार आहे.लेपर्ड सफारी पार्क प्रकल्पावरून आमदार व वन विभाग यांच्यात प्रशासकीय संघर्ष होण्याची चिन्हे. जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या ४ तालुक्यांचे वन विभागाचे (घोडप्रकल्प) मुख्य प्रशासकीय कार्यालय जुन्नर येथे आहे.>वन विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, प्रकल्पाच्या देखभालीचा खर्च व अपेक्षित उत्त्पन्न यांचा ताळमेळ बसणार नाही अशी गृहीतके वन विभागाकडून मांडण्यात येत असल्याची चर्चा आहे. जुन्नर तालुक्यात पर्यटनस्थळांची विविधता आहे. त्यात लेपर्ड सफारी पार्कमुळे भर पडेल, अशा जुन्नर तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत; त्यामुळे आता अखेरीस हे केंद्र कुठे जाते, हाच औत्सुक्याचा मुद्दा आहे.