शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात लेप्टोचा धोका

By admin | Updated: July 2, 2016 02:44 IST

मोठ्या प्रमाणात पसरतो़ या आजाराचा प्रमुख वाहक असलेल्या उंदरांचा संहार करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली होती़

मुंबई : मलेरियाच्या बरोबरीनेच पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस हा आजारही मोठ्या प्रमाणात पसरतो़ या आजाराचा प्रमुख वाहक असलेल्या उंदरांचा संहार करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली होती़ गेल्या पाच महिन्यांत शहर भागातच ९३ हजार ६४३ उंदीर मारण्यात आले आहेत़ मात्र उपनगरामध्ये पालिकेला मूषक संहारक मिळालेले नाहीत़ त्यामुळे लेप्टोचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या पश्चिम उपनगरातील नागरिक हवालदिल झाले आहेत़ गेल्या पावसाळ्यात लेप्टोच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती़ सर्वाधिक रुग्ण पश्चिम उपनगरातच आढळून आले होते़ जनावरांच्या मलमूत्रापासून लेप्टो फैलावत असल्याने नुकतेच तबेलेवाल्यांना पालिकेने नोटीस पाठवून स्वच्छता राखण्याची ताकीद दिली होती़ मुंबई शहरात उंदीर मारण्यासाठी पालिकेने विशेष पथक नेमले आहे़ या पथकाने जानेवारी ते मार्च २०१६पर्यंत ९३ हजार ६५३ उंदीर मारले़यापैकी सर्वाधिक २३ हजार ६१२ उंदीर मोहम्मद अली रोड, सॅण्डहर्स्ट रोड, मशीद बंदर या भागात मारण्यात आले आहेत़ एकीकडे शहरात ही मोहीम जोरात असताना उपनगरांमध्ये मात्र मूषक संहारक पालिकेला सापडलेले नाहीत़ प्रत्येक उंदरापाटी १० रुपये मोजण्याची पालिकेने तयारी दाखविली़ तरीही कोणतीही संस्था अथवा व्यक्ती पुढे आलेल्या नाहीत़ विशेष म्हणजे गेल्या वर्षी पश्चिम उपनगरातच लेप्टोचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते़ (प्रतिनिधी)>तबेल्यांमुळे उपनगरांना जास्त धोकाजानेवारी ते मे महिन्यापर्यंत ९३ हजार ६५३ उंदीर मारले़सॅण्डहर्स्ट रोड, मशीद बंदर या विभागात सर्वाधिक २३ हजार ६१२ उंदीर मारण्यात आले आहेत़जनावारांचे मलमूत्र पायाच्या जखमेवाटे शरीरात शिरल्यास लेप्टोचा संसर्ग होतो़ उपनगरांमध्ये सर्वाधिक तबेले असून, यातून जनावरांचे मलमूत्र पाण्यातून वाहत जाते़ त्यामुळे उपनगरांमध्ये लेप्टोचा धोका अधिक असतो़