शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बिबट्याच्या कातडीची तस्करी

By admin | Updated: June 20, 2016 01:06 IST

जिल्ह्यात बिबट्याची कातडी व नखांची तस्करी करणाऱ्या ३ जणांची टोळी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथकाने जेरबंद करून

लोणी काळभोर : जिल्ह्यात बिबट्याची कातडी व नखांची तस्करी करणाऱ्या ३ जणांची टोळी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथकाने जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे कातडे व नखे जप्त केली आहेत.पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार : पथकाने बाळू गवबा मधे (वय २५), सोमनाथ सुखदेव मधे (वय २७, दोघेही रा. चास पिंपळदरे, पो. ब्राम्हणवाडा, ता. अकोले, जि. अहमदनगर) व सूर्यकांत शांताराम काळे (वय ३२, रा. म्हसवडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या तिघांना अटक केली आहे. जिल्ह्यातील फरारी व हवे असलेले आरोपी पकडणे तसेच त्यांची माहिती काढण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती़ गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन मोरे, पोलीस हवालदार शरद वांबळे, विशाल साळुंके, चंद्रशेखर मगर, शफी शिलेदार, विघ्नहर गाडे, राजेंद्र पुणेकर, वसंत आंब्रे या पथकाने या तिघांना पकडले आहे.रविवारी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण-अहमदनगर महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबऱ्यांकडून अहमदनगर जिल्ह्यातील म्हसवडी गावच्या बाजूकडील डोंगरांतून पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे तिघे जण बिबट्याची कातडी व नखे विक्रीकरिता घेऊन येणार असल्याची माहिती राम जाधव यांना कळवली. त्यांनी पथकास योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. मिळालेल्या माहितीनुसार डोंगरांतून तिघे जण आले. त्यांना जागीच पकडून त्यांच्याकडील रंगाच्या पिशवीची तपासणी केली असता त्यांना त्यामध्ये बिबट्यासदृश प्राण्याची कातडी, तसेच एका बॅगेत मिशांचे केस व नखे सापडली. या तिघांनी संगनमताने कोणत्या तरी जंगलात अनधिकृतपणे प्रवेश करून हत्यार अथवा शस्त्राने शिकार करून विक्री करण्याच्या हेतूने त्याची कातडी व नखे केसांसह सोलून आणली, म्हणून त्यांना वन्यप्राणी कायदा कलमान्वये अटक करण्यात आली. (वार्ताहर)