शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळ्यात बिबट्या

By admin | Updated: March 29, 2016 01:50 IST

पर्यावरणाचा ऱ्हासामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यातच जंगल नष्ट होत असल्याने जंगली श्वापदांवरही परिणाम होत आहे. नुकताच कर्नाळा अभयारण्यात बिबट्या आढळल्याने

- वैभव गायकर,  पनवेल पर्यावरणाचा ऱ्हासामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यातच जंगल नष्ट होत असल्याने जंगली श्वापदांवरही परिणाम होत आहे. नुकताच कर्नाळा अभयारण्यात बिबट्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस ) केलेल्या सर्वेक्षणात हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कर्नाळा अभयारण्यात रानसई येथे हा बिबट्या आढळला असून त्याने दोन गुरांचा फडशा पाडला आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यात वर्षभर हजारो पर्यटक, पक्षिप्रेमी भेट देत असतात. शिवाय येथील ऐतिहासिक कर्नाळा किल्ला पाहाण्यासाठी अनेकजण येतात. मात्र याठिकाणी बिबट्या आढळल्याने रहिवासी तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेने अभयारण्यात बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला आहे. २२ ते २३ मार्च या दोन दिवसात बिबट्या या ठिकाणी फिरताना आढळला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उरण, पनवेल परिसरातील जंगल नष्ट होत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल केली जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे जंगली प्राणी स्थलांतर होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाळा अभयारण्याचे वनक्षेत्रपाल पवार यांच्याशी संपर्क साधला असता, बिबट्या स्थलांतरित असण्याची शक्यता असून एकापेक्षा जास्त बिबट्याही याठिकाणी असतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. १५० पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी, ३५ विदेशी स्थलांतरित प्रजातीचे पक्षी याठिकाणी आहेत. तसेच ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याचेही आकर्षण आहे. बिबट्या रानसई किल्ल्यापासून दूर आढळला असला तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.