शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वढूमध्ये बिबट्याचा पुन्हा हल्ला, ग्रामस्थ हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 01:51 IST

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे चाफावाडावस्तीवर शेतात काम करणाऱ्या रतन भंडारे या वृद्धावर बिबट्याने हल्ला केला असून बबन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे चाफावाडावस्तीवर शेतात काम करणाऱ्या रतन भंडारे या वृद्धावर बिबट्याने हल्ला केला असून बबन भंडारे यांच्यामुळे वृद्ध नागरिकाचा जीव वाचला आहे. वढूमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांंमध्ये दहशत निर्माण झाली आहे.वनविभाग पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने ग्रामस्थांचा जीव गेल्यावरच वनविभाग जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. चाफावाडावस्तीवर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रतन शंकर भंडारे (वय ६५) स्वत:च्या शेतात बाजरी काढण्यासाठी गेले असता शेजारील उसातून बिबट्या आला. बिबट्याने रतन भंडारे यांच्या अंगावर उडी मारली व डोक्यावर पंजा मारला. या वेळी बिबट्याच्या पंजाने भंडारे यांच्या डोक्याला मोठी जखम झाली असून त्यानंतर बिबट्याने हाताला, छातीवरही पंजे मारले होते. भंडारे यांच्या गळ्याभोवती टॉवेल असल्यामुळे ते बचावले. दरम्यान, शेजारीच शेतात पाहणी करण्यासाठी आलेल्या बबन भंडारे यांना रतन भंडारे यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना भंडारे रक्ताने माखलेले दिसले. बबन भंडारे यांनी त्यांना पाठीवर उचलून बिबट्याकडे पाहिले असता त्यांचीही भीतीने गाळण उडाली. मात्र त्याही परिस्थितीत बबन भंडारे यांनी रतन भंडारे यांना पाठीवरून दूरवर नेल्यामुळे जीव वाचला. याआधी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर भंडारे यांच्या वासराच्या गळ्याला बिबट्याने चावा घेत हल्ला केला होता. मात्र भंडारे यांच्या प्रसंगावधानाने वासराचाही जीव वाचला आहे.घटना समजल्यानंतर सरपंच रेखा शिवले, उपसरपंच संजय शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, आदींनी पाहणी केली. दरम्यान, शिरूरचे वनअधिकारी एम. जे. सणस यांना घटनेची माहिती मिळाली असता सणस यांच्यासह वनरक्षक ए. बी. पाचपुते, संजय पावणे, वनपाल एस. आर. खट्टे आदींनी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली. येथे अजून दोन पिंजरे आजच लावण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक पिंजऱ्याजवळ दोन कर्मचारी व ग्रामस्थ पाहणी करण्यासाठी सांगितले आहे. ही यंत्रणा सर्व बिबटे जेरबंद होईपर्यंत तैनात राहणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस यांनी सांगितले....तर वन विभागाचे अधिकारीच जबाबदार नोव्हेंबर महिन्यापासून वढू परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून वनकर्मचारी पिंजरा लावण्या पलीकडेकोणतीच कार्यवाही करीत नसल्याने यापुढे हल्ला झाल्यास वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सरपंच रेखा शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, रमेश शिवले यांनी सांगितले.रात्री पिंजऱ्याचे दार कोण उघडणार?वढू परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. पिंजऱ्याचे दार दिवसभर बंद करून रात्री उघडायचे असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सणस यांनी सांगितले, मात्र रात्री पिंजऱ्याचे दार नक्की उघडायचे कोणी? असा सवाल उपस्थित होत असून वनविभाग पिंजरा लावल्यानंतर त्या ठिकाणी फिरकतच नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. बिबट्याचे हल्ले तर सगळीकडेच होतात नवीन काय?बिबट्याचे हल्ले तर सर्वत्रच होत आहेत, त्यात नवीन काय, अशी प्रतिक्रिया वनपाल बी. आर. वाव्हळ यांनी दिल्याने नागरिकांनी संतप्त भूमिका घेत आमचा जीव जाण्याची वाट पाहताय का? असा सवाल केल्यावर वाव्हळ यांची बोलतीच बंद झाली असून वनकर्मचाऱ्यांची ग्रामस्थांप्रती किती उदासीनता आहे, याची जाणीव होत आहे.