शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
4
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
5
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
6
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
7
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
8
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
9
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
10
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
11
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
12
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
14
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
15
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
16
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
17
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
18
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
19
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
20
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

‘समृद्ध जीवन’च्या लीना मोतेवार पोलीस कोठडीत

By admin | Updated: August 12, 2016 04:02 IST

समृद्ध जीवन फुडस् इंडिया या कंपनीची संचालक लीना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी

पुणे : समृद्ध जीवन फुडस् इंडिया या कंपनीची संचालक लीना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे़ महेश मोतेवारलाअटक झाल्यानंतर त्या दुसऱ्याच्या नावावर भाड्याने घेतलेल्या घरात रहात असल्याची माहिती मिळाल्यावर सीआयडीने बुधवारी त्या ठिकाणाहून अटक केली़ विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी लीना यांना २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. समृद्ध जीवन फूड इंडिया या कंपनीविरुध्द राज्यातील विविध जिल्ह्यासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत़ सर्व आर्थिक गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे़ चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सीआयडीने लीना मोतेवार (वय ३७, रा़ विद्यादीप सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) यांना अटक केली़ या प्रकरणात महेश मोतेवार आणि राजेंद्र भंडारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस़ जे़ काळे यांच्या न्यायालयात सीआयडीने गुरुवारी लिना मोतेवार यांना हजर केले़ अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल सुनील हांडे यांनी सांगितले की, लिना मोतेवार या कंपनीची ५० टक्के शेअर होल्डर होती़ २०१३ मध्ये त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० शेअर्स असून त्यापैकी हा १७़११ टक्के हिस्सा आहे़ कंपनीच्या वाहनचालकाच्या घरी ठेवलेले १ कोटी रुपयांचे दागिने आरोपीचे असून त्याबाबत तपास करायचा आहे़ धनकवडी येथील घरात आरोपीच्याच फिंगर प्रिंटने लॉकर उघडले जाऊ शकते अशीच आणखीही लॉकर असण्याची शक्यता आहे. महेश मोतेवार अटकेत असताना आरोपीने कंपनीशी निगडीत असलेल्या विविध मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत़ कंपनीने त्यांना २००८-०९ ते २०१३ -१४ दरम्यान २० कोटी रुपयांचे कर्ज व अग्रीम स्वरुपात देण्यात आले आहे़ तसेच पगाराच्या स्वरुपात ६३ लाख रुपये दिले आहेत़ या रक्कमा कोणत्या उद्देशाने दिल्या, याचा तपास करायचा आहे़ गुंतवणुकदारांकडून गोळा केलेल्या पैशातून स्वत: करीता, कुंटुबाकरीता स्थावर मिळकती, जंगम मालमत्ता खरेदी केली आहे, त्याचा तपास करायचा आहे़ वेगवेगळ्या राज्यात गुंतवणुक केली आहे़ त्याचा तपास करायचा आहे़ न्यायालयाने अधिक तपासासाठी २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़ (प्रतिनिधी)समृद्ध जीवन फुडस् कंपनीची लिना मोतेवार ५० टक्के शेअर होल्डरमहेश मोतेवार यांच्या अटकेनंतर कंपनीची मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नसंचालक असलेल्या लीना मोतेवारला कंपनीनेच दिले २० कोटींचे कर्ज कंपनी ग्राहकांची संख्या व उपलब्ध लाईव्ह स्टॉकची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावतपुण्यातील प्रसिद्ध सराफाकडील खाते उताऱ्यानुसार ४४ वेगवेगळ्या व्यवहारातून १ कोटी ६२ लाख रुपयांची सोने, हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी