शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाचे प्रधान सचिव कळसेंना मुदतवाढ नाकारली

By अतुल कुलकर्णी | Updated: January 1, 2019 02:06 IST

विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना मुदतवाढ नाकारण्याचा निर्णय विधिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कळसे ३० जून २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले होते.

मुंबई : विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना मुदतवाढ नाकारण्याचा निर्णय विधिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कळसे ३० जून २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यांना लगेच १ जुलैपासून सहा महिने मुदतवाढ दिली गेली.ती मुदत ३१ डिसेंबरला संपत असताना पुन्हा ६ महिने मुदतवाढ देण्यासाठीच्या हालचाली चालू असताना हा निर्णय झाला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही माहिती लोकमतला दिली. कळसे यांना मुदतवाढ देण्याचा प्रश्नच नव्हता, असे ते म्हणाले.राज्यासाठी कायदे बनविणाऱ्या महाराष्टÑ विधिमंडळाचा कारभार सेवानिवृत्त अधिकाºयांच्या हाती गेल्याचे व प्रधान सचिवांपासून ते ग्रंथपालापर्यंत सर्वच वरिष्ठ अधिकारी वयोमानानुसार निवृत्त झाले तरीही त्यांना मुदतवाढ देऊन अथवा कंत्राटी नेमणुकीने पदांवर कायम ठेवण्यात आल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यामुळे सेवाज्येष्ठतेनेही पदे मिळण्याची आस लावून बसलेल्या अधिकाºयांच्या बढत्या रखडल्या असून त्यांच्याअसंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो, असेही लोकमतने प्रकाशित केले होते.३१ डिसेंबर रोजी कळसे यांची मुदत संपत असताना उपसचिव विलास आठवले यांनी सभापती, अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांना पत्र पाठवून कळसे यांना मुदतवाढ न देता त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. कळसे हे भाट जातीचे असून त्यांनी सचिवालयात ठाकूर जातीचे प्रमाणपत्र सादर करुन १९८१ साली अनुसूचित जमाती या प्रवर्गातून नोकरी मिळवल्याचे आपण सचिवालयाच्या व उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे अशा व्यक्तीच्या नियंत्रणात प्रधान सचिवाचे पद ठेवणे योग्य नाही, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.शासकीय सेवेचे नियम विधिमंडळ सचिवालयास लागू आहेत की नाहीत? इतरांसाठी कायदे व नियम बनविणारेच जर ते पाळणार नसतील तर त्या कायद्यांना नैतिक अधिष्ठान काय? हे मुद्देही या निमित्ताने पुढे आले आहेत.मुख्यमंत्र्याकडे दिले होते पत्रगेल्या ३ ते ४ वर्षांपासून एक सचिव व तीन सहसचिवांची पदे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाºयांना पदाचा अतिरिक्त कार्यभार किंवा सेवेत मुदतवाढ देऊन स्वत: कळसे यांनीही मुदतवाढ मिळवल्याचेही उपसचिव विलास आठवले यांनी पत्रात लिहिले आहे.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवन