शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ दणाणले : उमटले तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:15 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोर्चाची यशस्वी सांगता झाली असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एक ओळीचा ठराव सभागृहाने एकमुखाने करावा, अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार वेलमध्ये उतरले. चर्चा नको, आरक्षण द्या, अशा घोषणा सुरू झाल्या. काही आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही आरक्षणाचा मुद्दा लावून धरला.विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चा नको, मराठा आरक्षण द्या, अशी मागणी केली आणि विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळाला सुरुवात केली. सत्तारूढ आमदारही आरक्षणाची मागणी करीत होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज गदारोळामुळे दुपारी ३पर्यंत तहकूब करण्यात आले.विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मोर्चासंदर्भात निवेदन केल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसून मोर्चेकºयांचे त्यामुळे समाधान झालेले नाही, अशी टीका केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.मोर्चा शांततेत, आमदार भिडलेआपल्या मागण्यांसाठी एकीकडे अत्यंत शिस्तीत आणि शांततेत निघालेला मराठा क्रांतीचा मूकमोर्चा, तर दुसरीकडे विधान भवनाच्या पायºयांवर भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार हमरीतुमरीवर उतरून एकमेकांशी भिडल्याचे चित्र विधान भवनाच्या पायºयांवर पाहायला मिळाले.आपण मराठा समाजाचे कैवारी आहोत हे दाखविण्याच्या प्रयत्नात भाजपा आणि राष्ट्रवादीचे सदस्य अक्षरश: एकमेकांशी भिडले. जोरदार घोषणाबाजी करत या आमदारांनी कुरघोडीचा प्रयत्न चालविल्याने विधान भवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विधान भवनातील मार्शल्सना धाव घ्यावी लागली.विधान परिषदेत धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनीही सरकारवर टीका केली. मोर्चाच्या मागण्यांपैकी निम्म्यांनाही सरकारने हात घातलेला नाही. सरकार आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची मोर्चेकºयांची भावना झाली आहे, असा दावा त्यांनी केला.सरकारने केलेल्या घोषणांच्या कालबद्ध अंमलबजावणीचा कार्यक्रम कधी देणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. अन्य समाजांना आरक्षण देण्याबाबत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी औदार्य दाखवले तसेच आता मराठा समाजाबाबत दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधकांनी सभात्याग केला.चंद्रकांत पाटील यांनी आरोप फेटाळलेमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटी कायदा या तीन बाबी राज्य सरकारच्या हाती नसल्याचे सांगत त्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.