शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विधिमंडळाचे येणार चॅनेल

By admin | Updated: October 8, 2015 03:26 IST

विधिमंडळातील कामकाज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा चॅनलच्या धर्तीवर लवकरच महाराष्ट्र विधिमंडळाचे चॅनल सुरू होत आहे,

- अतुल कुलकर्णी,  मुंबई विधिमंडळातील कामकाज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा चॅनलच्या धर्तीवर लवकरच महाराष्ट्र विधिमंडळाचे चॅनल सुरू होत आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली.संसदेचे आणि विधिमंडळांचे कामकाज १०० दिवस चालावे, असा निर्णय विधिमंडळ अध्यक्ष व सभापतींच्या असोसिएशनने घेतला होता. त्यास सर्वपक्षीय मान्यतही होती. मात्र, पक्षीय राजकारणातून अनेकदा सभागृह बंद पाडले जाते. त्यामुळे लोकांना सभागृहात नेमके काय चालते, हे कळले पाहिजे. त्यासाठीच विधिमंडळाचे स्वतंत्र चॅनल सुरू करण्यात येणार असून, त्यावर दोन्ही सभागृहाचे कामकाज आलटून पाटलून दाखवले जाईल, असे बापट यांनी सांगितले.‘अधिवेशनानंतर या चॅनलवर काय दाखवले जाणार?’ असे विचारले असता बापट म्हणाले, ‘महाराष्ट्र संपन्न राज्य आहे. छोट्याशा गावातही अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. सरकार अनेक योजना आखत असते. त्या योजनांचा गोरगरिबांना कसा फायदा होऊ शकतो, याची माहिती दिली जाईल. सध्या सह्याद्री दूरदर्शनवर ‘जय महाराष्ट्र’ नावाचा एक तासाचा कार्यक्रम असतो, पण सरकारचे स्वत:चे चॅनल असेल, तर सरकारला स्वत:च्या अनेक चांगल्या गोष्टी मांडता येतील,’ असेही बापट यांनी स्पष्ट केले.या आधीदेखील माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी असा प्रयत्न केला होता. मात्र, तो मागे पडला. यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘त्यावेळी आम्ही प्रोजेक्ट रिपोर्टही तयार केला होता. सल्लागारही नेमले होते. कामाची सुरुवात केली होती, पण विधानमंडळ सचिवालय आणि अन्य काहींच्या हेतूंवर प्रश्न निर्माण झाल्याने आपणच हा प्रकल्प मागे ठेवला होता, पण आता सभापती, मुख्यमंत्री यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्याने हा विषय मार्गी लागेल.’ विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले, ‘विधिमंडळाचे स्वत:चे चॅनल सुरूव्हावे, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न होत आहेत. सगळ्या गोष्टी जुळून आल्या, तर असे चॅनल सुरूकरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल.’दिल्लीतून माहिती घ्या - मुनगंटीवारया विषयाची फाईल वित्त विभागात गेली असता, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यास सकृतदर्शनी होकार दिला. मात्र, काही प्रश्न उपस्थित करत, दिल्लीला लोकसभा व राज्यसभा या दोन चॅनलची माहिती घ्यावी, असे आदेश दिले.