शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर विधान परिषदेतील कामकाज ठप्प

By admin | Updated: July 29, 2016 18:32 IST

भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकी ठराव मांडल्याचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ - भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकी ठराव मांडल्याचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अखंड महाराष्ट्र आमच्या अस्मितेचा विषय आहे, याबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केला.

शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकीय ठराव मांडला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना नाना पटोले यांनी मांडलेला ठराव गंभीर बाब असल्याचे सांगत मुंडे यांनी लोकसभेची कामकाज पत्रिकाच सभागृहात फडकवली. तर, अखंड महाराष्ट्र हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. लोकसभेतील ही घटना अत्यंत गंभीर आहे. नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना विचारूनच ठराव मांडला असेल.

यावरून अखंड महाराष्ट्राच्या विरोधात भाजपाचे कारस्थान असल्याचा वास येतो. नीलम गो-हें यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियम २३ अन्वये अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडला होता. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. आमच्या सर्वांच्या अस्मितेचा हा विषय असताना विधी व न्याय विभाग अस्मितेवर मत नोंदविणार काय, असा सवाल राणे यांनी केला. आमच्या अस्मितेसाठी तर सभापतींने सर्वांचे नेतृत्व करावे, अशी जोरदार मागणी राणे यांनी केली.

राज्याची विधानसभा आणि विधान परिषद अखंड महाराष्ट्राच्या बाजूने असल्याचे शिवसेनेच्या नीलम गो-हे म्हणाल्या. अखंड महाराष्ट्राच्या बाजूने याआधी अनेकदा विधिमंडळात ठराव करण्यात आले आहेत. तसेच या विषयावरील चर्चेसाठी गेल्या अधिवेशनात विधानपरिषद नियम २३ अन्वये प्रस्ताव दिल्याची आठवण गो-हे यांनी करून दिली. अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयाला तारीख पे तारीख न देता चर्चा करण्याची मागणी गो-हे यांनी केली.

अखंड महाराष्ट्रावरुन सुरु असलेल्या या गदारोळात भाजपा विरूद्ध अख्खे सभाग्रह असे चित्र निर्माण झाले होते. सभाग्रहातील गोंधळाच्या वातवावरणामुळे सुरूवातीला दहा मिनिटासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर गोंधळ वाढतच गेल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब केल्याचे सभापतींनी जाहीर केले. जोगेंद्र कवाडेंचा जय विदर्भ एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर आक्रमक झाले असताना काँग्रेसचे सहयोगी सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी मात्र वेगळ्या विदर्भाचा नारा दिला. तुम्ही सर्व अखंड महाराष्ट्राचा मुद्दा मांडता तशी आमची वेगळ्या विदर्भाची मागणी आहे. हा कोणत्या एका पक्षाचा मुद्दा नाही. नागपूर करारानुसार विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. मात्र, या नागपूर करारातील शिफारसींची पुर्तता केली जात नाही, असा आरोप कवाडे यांनी केला. कवाडे यांची वेगळी भूमिका जाणवताच विरोधी बाकावरील सदस्यांनी गदारोळाला सुरुवात केली. शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाची अडचणवेगळ्या विदर्भास शिवसेनाचा तीव्र विरोध आहे. विधिमंडळात वेळोवेळी शिवसेनेने तशी भूमिकाही मांडली. आधीच विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे. त्यातच शिवसेनेची त्यांना साथ आहे. गेल्या मार्च मधील अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांसह शिवसेनेने एकत्रितपणे नियम २३ अन्वये अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव सभापतींकडे दिला आहे.

विधानपरिषदेच्या इतिहासात या नियमान्वये कुणीही अद्यापपर्यंत प्रस्ताव दिलेला नाही. या प्रस्तावावर मतदान घेण्याची कायद्यात तरतूद आहे. प्रस्ताव चर्चेला आल्यास विधानपरिषदेत भाजपाची कोंडी होवू शकते. या प्रस्तावावर सभापतींनी निर्णय घेतला नसल्याने प्रलंबित आहे. या प्रस्तावाचा शुक्रवारी पुन्हा पुनरूच्चार झाला.अहो, मी काही पाकीस्तानात राहत नाही- सभापती

सभागृहात सभापती उभे असताना अथवा बोलत असताना अन्य कोणीही सदस्याने मध्ये न बोलण्याचा संकेत आहे. पावसाळी अधिवेशनात मात्र विरोधी बाकांवरील विशेषत: राष्ट्रवादीचे सदस्य वारंवार सभापतींचे बोलणे चालू असताना मध्येच उठून आपला विषय रेटत असल्याचे वारंवार दिसून आले. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून हा प्रकार सहन करणा-या सभापतींचा शुक्रवारी मात्र कडेलोट झाला. अखंड महाराष्ट्राच्या मुद्दयावर ‘अहो, मी काही पाकिस्तानात राहत नाही. मीही महाराष्ट्रातच राहतो. मला माझे म्हणणे तरी मांडू देणार आहात की नाही, असा संतप्त सवाल करत सभापतींनी विरोधकांना रोखले.